Cash For Job: 1 कोटी 20 लाखांची फसवणूक? 'Cash For Job Scam' प्रकरणात ढवळीतील शिक्षकाला अटक

Goa Crime: पोलिसांच्या अटकेत असलेला संशयित योगेश शेणवी कुंकळ्येकर याने तब्बल वीसजणांकडून सरकारी नोकरीसाठी पैसे घेतले असून ही रक्कम एकूण १ कोटी २० लाख रुपये असल्याचे समोर आले आहे.
Cash For Job
Cash For JobDainik Gomantak
Published on
Updated on

Cash For Job Scam Goa

फोंडा: राज्यात पैसे घेऊन सरकारी नोकरी देण्याच्या प्रकरणांत वाढ होत चालली असतानाच आज (सोमवारी) फोंडा पोलिसांनी ढवळी येथील एका विद्यालयात विद्यादान करणाऱ्या शिक्षकाला अटक केली आहे. सुखवस्तू कुटुंबातील असूनही या शिक्षकाने छानछोकीसाठीच हा प्रकार केल्याची सध्या चर्चा आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या शिक्षकाचे नाव योगेश शेणवी कुंकळ्येकर (वय ४९ वर्षे) असून तो ढवळी येथील रहिवासी आहे. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांच्या अटकेत असलेला संशयित योगेश शेणवी कुंकळ्येकर याने तब्बल वीसजणांकडून सरकारी नोकरीसाठी पैसे घेतले असून ही रक्कम एकूण १ कोटी २० लाख रुपये असल्याचे समोर आले आहे.

...ती महिला कोण?

उपलब्ध माहितीनुसार, योगेश शेणवी कुंकळ्येकर याने हे पैसे एका महिलेकडे दिले आहेत. ही महिला सध्या बेपत्ता आहे. तिच्या शोधात पोलिस असून यासंबंधीचे आदेश इतर पोलिस स्थानकांनाही दिले आहेत. योगेश याने सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने पैसे घेतल्यानंतर हे पैसे ‘त्या’ महिलेकडे दिले असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. त्याची शहानिशा करण्यासाठी ही महिला पोलिसांच्या ताब्यात असणे गरजेचे आहे; पण ही महिलाच सध्या बेपत्ता आहे.

अभियंता परबला ३ दिवसांचा रिमांड

तारीवाडा - माशेल येथील संदीप परब याला रविवारी म्हार्दोळ पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला फोंडा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता तीन दिवसांचा रिमांड देण्यात आला. संदीप हा जलस्रोत खात्यातील अधिकारी आहे. माशेल येथील विशाल गावकर याने संदीप परब याच्याविरुद्धच म्हार्दोळ पोलिस स्थानकात तक्रार दिली आहे. संदीपने एलडीसी पदासाठी पाच लाख रुपये घेतल्याचे त्याने तक्रारीत म्हटले आहे.

दोषींवर कारवाई होणारच : शिरोडकर

जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांना विचारले असता, ते म्हणाले, पैसे घेऊन नोकरी देण्याच्या या प्रकरणात गुंतलेल्या सर्वांवर कारवाई होणार आहे. अभियंता म्हणून सरकारी सेवेत काम करणाऱ्या संदीप परब याचीही चौकशी होणार आहे. खरे म्हणजे अशा पदावर असलेल्या व्यक्तीने असे काम करणे म्हणजे नामुष्की असून संदीपवर कारवाई होणार आहे. खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही अशा प्रकरणांत गुंतलेल्यांवर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Cash For Job
Goa Police: गोव्यात दोन पोलिस कॉन्स्टेबल बडतर्फ! भररस्त्यात राडा, फसवणूक अंगलट, प्रोबेशन काळातच नोकरी गमावली

वास्को फसवणूक; दुसरा संशयितही अटकेत

वास्को : नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक प्रकरणी आज वास्को पोलिसांनी दुसरा संशयित सूरज भिकाजी नाईक (वय ४७ वर्षे) याला अटक केली. सूरज कालपासून फरार होता. शिक्षण खात्यामध्ये साक्षी केरकर यांना ‘मल्टी टास्क’ची नोकरी देण्याचे आश्वासन देऊन ४ लाख ३० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी संशयित गोविंद मांजरेकर याला पोलिसांनी रविवारी अटक केली होती. आज त्याला न्यायालयात हजर केले असता जामीन मंजूर केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com