Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vote Chori: मतांची चोरी हा देशातील सर्वांत मोठा घोटाळा! सरदेसाईंचा घणाघात; BLA आमदारांचे ‘एजन्ट’ असल्याचे केले आरोप

Goa politics: दुहेरी नागरिकत्वाचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. पण कुजिरा येथील एका प्रकरणात एक बिहारी मुंडकार झाला आहे. हे उदाहरण कशाचे धोतक आहे, असा सवाल सरदेसाईंनी केला.

Sameer Panditrao

सासष्टी: भारत हा जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश असे मानले जाते. निवडणूक आयोग हा निवडणूक प्रक्रियेतील सर्वोच्च संस्था आहे. पण याच संस्थेमार्फत सरकारी पक्ष मतांची चोरी करू लागला तर लोकांचा देशातील लोकशाहीवर असलेला विश्‍वास नाहीसा होईल.

मतांची चोरी हा देशातील सर्वांत मोठा घोटाळा आहे, सत्ताधारी भाजप व निवडणूक आयोगाच्या चुकीच्या कृत्त्यांना वाचा फोडण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे काळाची गरज आहे, असे गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा फातोर्डेचे आमदार विजय सरदेसाई यांनी मडगावात पत्रकारांना सांगितले.

गोव्यात मात्र सर्व गोमंतकीय झोपी गेलेले आहेत. २०२७ च्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला त्यांची योग्य जागा दाखवू , असे ते मानतात. पण तसे करून चालणार नाही. आपण १५ ऑगस्ट नंतर आपल्या मतदारसंघात मतदार यादी घेऊन प्रत्येक घरांमध्ये जाऊन व चौकशी करुन मतदारांची खात्री करून घेणार आहे.

बीएलओ (बूथ स्तरीय अधिकारी) हे सत्ताधारी पक्ष नियुक्त करतो. म्हणजेच मतांच्या चोरी प्रकरणात सत्ताधारी पक्षाचा हात आहे, हे स्पष्ट होते. बीएलए (बूथ स्तरावरील एजन्ट) हे आता आमदारांचे ‘एजन्ट’ झाले आहेत, अशी टीका सरदेसाई यांनी केली.

गोव्यात लोकशाहीची जी हत्या, भ्रष्टाचार चालू आहे ते पाहता गोमंतकीय त्यांना मते देणार नाहीत, याची खात्री सत्ताधारी पक्षाला झाली आहे. म्हणून येन केन प्रकारे परप्रांतीयांमार्फत निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न ते करीत आहेत.

बिहारी, आसामी, राजस्थानी, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातील लोकांना जवळ करण्याचा त्यांचा प्रयत्न आहेच. आता नेपाळींनाही ते जवळ करू पहात आहेत. नेपाळ हा वेगळा देश आहे, त्यामुळे दुहेरी नागरिकत्वाचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. पण कुजिरा येथील एका प्रकरणात एक बिहारी मुंडकार झाला आहे. हे उदाहरण कशाचे धोतक आहे, असा सवाल सरदेसाईंनी केला.

परप्रांतीयांव्दारे निवडणूक जिंकण्याचा घाट!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आसामींना गोव्यात संरक्षण दिले जाईल, असे जाहीर केले आहे. परप्रांतीयांना संरक्षण देण्याची भाषा करणे यात निवडणुका जिंकण्याचा भारतीय जनता पक्षाचा डाव असल्याची टीका आमदार विजय सरदेसाई यांनी केली. त्यांना कशाही प्रकारे लबाडी करुन निवडणुका जिंकायच्या आहेत,असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'आरजी'मधील घडामोडी गोव्यातील परंपरेला धरूनच

पंधरा वर्षांनंतर राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण!

Goa Air India: गोव्याकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या फेऱ्यांत कपात; पावसाळी पर्यटनावर होणार परिणाम, इंधनदर वाढीचा फटका

Viral Video: विमानाची टक्कर झाली अन् हवेतच पॅराशूट फाटला... मृत्यूच्या दाढेतून 44 वर्षांची महिला थोडक्यात वाचली; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Goa Fraud Cases: गोव्यातून थेट दुबईत ठोकली धूम! तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंडचा पोलिसांना चकमा; लुकआऊट नोटीस जारी

SCROLL FOR NEXT