Mirabag Protest Dainik Gomantak
गोवा

Mirabag: '400 कोटींचा प्रकल्प लघुबंधारा कसा'? मीराबागवरुन सरदेसाईंचा प्रश्न; आंदोलकांची भेट घेत दिला पाठिंबा

Vijai Sardesai: लोकांच्या जमिनी हस्तांतरित करता येत नसल्यामुळे प्रकल्प लघुबंधाऱ्याच्या नावाने उभा करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला.

गोमन्तक डिजिटल टीम

सांगे: मीराबाग बंधारा धरणा आंदोलनाला ३८ दिवस पूर्ण झाले असून आता त्या आंदोलनाला अधिक बळकटी मिळू लागली आहे. गुरुवारी गुडी पाडव्याचा सण त्या ठिकाणी साजरा करून आंदोलनकर्त्यांनी सरकारला एक प्रकारे विजयाची गुढी उभारल्याचा संकेत दिला आहे. या आंदोलनाला यश मिळेल अशी धारणा बाळगून मोठ्या संख्येने नागरिक एकत्र होऊ लागले आहेत.

आमदार विजय सरदेसाई यांनी या आंदोलकांची भेट घेतली. सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन बंधारा रद्द करीत असल्याची घोषणा केली नाही, यावरून जनतेची चिंता सरकारला नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या प्रारंभ होत असताना या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावात जनजागृती करून, भाजपचे गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मतदारसंघात सरकार विरोधात तीव्र उठाव करावा लागणार आहे.

आमदार सरदेसाई म्हणाले की, “आम्हाला राजकारण करायचे नाही, पण सरकार हे राजकारण करायला भाग पाडत आहे.” सरकार चारशे कोटी रुपये खर्चून उभारणाऱ्या बंधाऱ्याला लघुबंधारा कसा म्हणतो, यावर संशय निर्माण होत असून, लोकांच्या जमिनी हस्तांतरित करता येत नसल्यामुळे प्रकल्प लघुबंधाऱ्याच्या नावाने उभा करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला.

विधानसभेत ज्या चार जणांनी आपला आवाज उठविला, त्यांना दोषी ठरविण्याचा प्रयत्न झाला तर संपूर्ण गोवा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.यावेळी माजी मंत्री दीपक पाऊसकर उपस्थित होते.

प्रकल्प रद्द होईपर्यंत आंदोलन : पाऊसकर

माजी मंत्री दीपक पाऊसकर म्हणाले की, सुरुवातीपासून या आंदोलनाच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो असून सरकार हा प्रकल्प रद्द होईपर्यंत जनतेच्या पाठीशी राहणार आहे. देविदास आमोणकर म्हणाले की, सत्याच्या आग्रहाने बसलेल्या जनतेचा आवाज ऐकू येत नाही हे दुर्दैव आहे. सरकारने आपला हट्ट सोडून लोकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. या सत्याग्रहाला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आपा नाईक, नगरसेवक मेशू डिकॉस्ता, विकास भगत, संकेत भंडारी यांनी आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bengaluru Crime: 24 वर्षांचा आनंद अवघ्या 4 महिन्यात विरला, पोटच्या जुळ्या मुलींची आईनेच केली हत्या; बंगळुरुतील घटनेनं हादरला देश

Goa Law And Order: आकड्यांचा सलाम!

Goans Surrender Passports: रोज सरासरी 5 गोमंतकीय पासपोर्ट करतात सरेंडर; 3.5 वर्षांत तब्बल 6,960 जणांनी पासपोर्ट सोडला

Diamond Robbery: 380000000 चा 200 कॅरेटचा हिऱ्यांचा हार लंपास, 95 वर्षांचा शाही इतिहास! ऑस्ट्रियातील घटनेनं खळबळ; इंटरपोलकडून चोरट्यांचा शोध सुरु

Goa PSC Chairman Appointment: 'गोवा लोकसेवा' अध्यक्ष नियुक्तीला हायकोर्टात आव्हान; राज्य सरकारसह उदयसिंह रावराणे यांना नोटीस

SCROLL FOR NEXT