Karnataka Election Result  Dainik Gomantak
गोवा

Karnataka Election Result 2023 : कर्नाटकातील विजय हा राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’चा परिणाम ​​

काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया : ही तर हुकूमशाहीवर केलेली मात

गोमन्तक डिजिटल टीम

काँग्रेस पक्षाच्या कर्नाटकात दणदणीत विजयानंतर गोव्यातील काँग्रेसच्या नेत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. दिलेल्या प्रतिक्रियांत बहुतेक काँग्रेस नेत्यांनी हा विजय म्हणजे हुकूमशाहीवर जनतेने केलेली मात आहे, असे म्हटले आहे.

गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित पाटकर म्हणाले, काँग्रेसवर विश्वास ठेवल्याबद्दल आणि कर्नाटकात काँग्रेसला विजयी केल्याबद्दल कर्नाटकातील जनतेचे आभार मानतो. लोकांनी भ्रष्टाचार, बेरोजगारी, सामाजिक भेदभाव, महागाई आणि पैशांच्या सत्तेच्या विरोधात मतदान केले आहे. लोकशाहीला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी हे जनमत आहे.

कार्यकर्त्यांत जोश

कर्नाटकातील काँग्रेस पक्षाचा विजय ही लोकांनी हुकूमशाहीवर केलेली मात आहे. जेव्हा मणिपूर जळत होते तेव्हा काही केंद्रीय नेते तिकडे लक्ष न देता कर्नाटकात प्रचारासाठी ठाण मांडून बसले होते, हे जनतेने विसरता काम नये. काँग्रेस पक्षाच्या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांत नवीन जोश संचारला आहे.

- बीना नाईक, प्रदेश महिला अध्यक्ष, काँग्रेस

कर्नाटकी जनतेचा विजय

कर्नाटकातील काँग्रेस पक्षाचा विजय हा खरे तर कर्नाटकी जनतेचा विजय आहे. मतदारांनी ४० टक्के कमिशन सरकार आणि फुटीरतावादी शक्तींच्या विरोधात मतदान केले आहे.

कर्नाटकात बजरंग दल, टिपू सुलतान आदी मुद्दे हाती घेऊन भाजपने मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. तरीही काँग्रेसचे केंद्रीय नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा कर्नाटक निवडणुकीत फायदा झाला आहे. - गिरीश चोडणकर, काँग्रेस नेते

टुकार मुद्यांवर राजकारण

कर्नाटक निवडणुकीचा निकाल हा लोकशाहीचा विजय आहे. भाजपने कर्नाटकातील निवडणुकीदरम्यान टुकार मुद्यांवर राजकारण करण्याचा प्रयत्न केला; पण कर्नाटकातील जनतेने खऱ्या मुद्यांना महत्त्व दिले आणि हे कर्नाटक निवडणुकीच्या निकालात दिसून आले आहे. - विजय सरदेसाई, अध्यक्ष, गोवा फॉरवर्ड

खोट्या आश्वासनांना मिळाली तिलांजली

राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेमुळे लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास मोठा हातभार लागला आहे. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयावरून दिसून येते की, जनतेने भाजपचे खोटे बोलणे नाकारले आहे. जनतेने महागाई, उच्च कर, भाजप सरकारचा अवाजवी खर्च पाहिला आहे, म्हणून त्यांनी कर्नाटकात काँग्रेसला निवडले आहे. - फ्रान्सिस सार्दिन, खासदार

बलाढ्य नेत्यांनाही जोरदार धक्के

भारतात धार्मिक राजकारणाला थारा नाही. भारत हा सर्वधर्मसमावेशक देश असून तेथील जनतेने फुटीरवादी आणि भ्रष्ट भाजपला नाकारले आहे.

कर्नाटकात खुद्द देशाचे पंतप्रधान आणि अनेक दिग्गज नेत्यांनी निवडणूक प्रचार केला. सर्व शक्ती पणाला लावली. मात्र, लोकांनी काँग्रेस पक्षाला आपला कौल दिला. - ॲड. कार्लुस फेरेरा, आमदार

‘भगवान के घर देर है अंधेर नहीं है’

‘भगवान के घर देर है अंधेर नहीं है’. कर्नाटकचा निवडणूक निकाल सर्वांना स्पष्ट संदेश आहे की लोकशाही आणि भारताचे संविधान सर्वोच्च आहे. या देदीप्यमान विजयासाठी काँग्रेस पक्षाचे अभिनंदन. हा विजय विश्वासघात करणारे आणि पक्षांतर करणाऱ्यांसाठी एक संकेत आहे. - एल्टन डिकॉस्टा, काँग्रेसचे आमदार, केपे

लोककल्याणकारी सरकारचे स्वप्न

काँग्रेस पक्षाचा कर्नाटकमधील विजय मोठा आहे. लोककल्याणकारी सरकार मिळावे, हे जनतेचे स्वप्न अखेर साकार झाले आहे. हा विजय शक्य करण्यासाठी प्रशंसनीय कार्य केल्याबद्दल सर्व कर्नाटक काँग्रेस नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन.

-जोएल आंद्राद, अध्यक्ष, गोवा प्रदेश युथ काँग्रेस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT