Vice President BJP state Kisan Morcha Goa Sudesh Mayekar joined AAP 
गोवा

भाजप प्रदेश किसान मोर्चा गोवाचे उपाध्यक्ष सुदेश मयेकरांचा 'आप'मध्ये प्रवेश

सुदेश मयेकरांचे आप'मध्ये अरविंद केजरीवाल यांनी स्वागत केले

दैनिक गोमन्तक

भाजप कळंगुट ब्लॉकचे सरचिटणीस, भाजपा प्रदेश किसान मोर्चा गोवाचे उपाध्यक्ष, माजी उपसरपंच आणि कळंगुटचे विद्यमान पंच श्री सुदेश मयेकर यांनी आपल्या समर्थकांसह आज आण आदमी पार्टीमध्ये (AAP) प्रवेश केला.

मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. तरीही भाजपा त्याबाबत गंभीर नसल्याबाबत केजरीवाल यांनी खेद व्यक्त केला. राज्यातील भ्रष्ट मुख्यमंत्री बदलण्याऐवजी केंद्र सरकारने त्यावेळी राज्यपालच बदलला. पण, सत्य अधिक काळ लपून राहत नाही. आम्ही सत्तेत आल्यानंतर मात्र भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात पाठवणार आहोत, असे ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी काल स्पष्ट केले.

यापुर्वी एसटीचे प्रमुख नेते आणि राय येथील जिल्हा परिषदेचे सदस्य डॉम्‍निक गावकर यांनी आपचे गोवा संयोजक राहुल म्हांब्रे यांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षात सोमवारी प्रवेश केला. त्यांचे स्वागत करताना राहुल म्हांबरे म्हणाले, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आपमध्ये सामील होत आहे, हा खरोखरच आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. डॉम्‍निक गावकर हे गोव्यातील एक प्रमुख नेते आहेत आणि त्यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. राय मतदारसंघात त्यांनी भरीव काम केले असून सलग तीनवेळा त्यांनी ही जागा जिंकली आहे. आपमधील त्यांच्या प्रवेशाने युवकांना आणि आमच्या पक्षाच्या तळागाळातील सदस्यांना मोठी चालना मिळाली आहे. आता भाजपा प्रदेश किसान मोर्चा गोवाचे उपाध्यक्ष, माजी उपसरपंच आणि कळंगुटचे विद्यमान पंच श्री सुदेश मयेकर यांनी आपमध्ये प्रवेश केल्याने कळंगुटचे राजकारण बदलण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narkasur in Goa: नरकासुराला 'सायलंट' ब्रेक! रात्री 12 नंतर संगीत वाजवण्यावर पोलिसांचे निर्बंध

Ravi Naik: रवींना 'मगो'चे नेतृत्व मिळाले असते तर...?

Smriti Mandhana Wedding: नॅशनल क्रश क्लीन बोल्ड! स्मृती मानधना लवकरच लग्नबंधनात, 'या' संगीत दिग्दर्शकासोबत जुळली रेशीमगाठ

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

SCROLL FOR NEXT