Kala Academy in Panjim  Dainik Gomantak
गोवा

Kala Academy: कला अकादमीची श्वेतपत्रिका हवीच; नाट्यकलाकार देविदास आमोणकर यांची सरकारकडे मागणी

Kala Academy: गेल्‍या तीन वर्षांपासून कला अकादमी बंद असल्याने गोव्‍याची मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक हानी झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Kala Academy: गेल्‍या तीन वर्षांपासून कला अकादमी बंद असल्याने गोव्‍याची मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक हानी झाली आहे. या वास्‍तूच्‍या कामाबाबत कलाकारांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. जर सरकार धुतल्या तांदळासारखे असेल तर कला अकादमीबाबत श्‍वेतपत्रिका जारी करावी, जेणेकरून सर्व चित्र स्पष्ट होईल, असे ज्येष्ठ नाट्यकलाकार देविदास आमोणकर यांनी सांगितले.

गोमन्तक टीव्हीवरील ‘सडेतोड नायक’ या कार्यक्रमात आमोणकर बोलत होते. नाट्यकलाकार ज्ञानेश मोघे व युगांक नायक यांनीही त्‍यात सहभाग घेतला. ‘गोमन्‍तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांनी त्‍यांच्‍याशी संवाद साधला.‍ कला अकादमीच्या कामात नेमका कुणाचा दोष आहे, हे समोर येणे गरजेचे आहे, असे आमोणकर यांनी सांगितले.

ज्ञानेश मोघे म्‍हणाले की, कला अकादमीच्‍या कामाबाबत कला-संस्‍कृतीमंत्री गोविंद गावडे यांना टार्गेट करण्यात येत आहे. परंतु व्यवस्थेबाबत कोणीच बोलत नाही. कामाची निविदा न काढता ते देण्‍यात अनेकांचा हात आहे. परंतु गावडेंनी नूतनीकरण जणू काही आपणच करत असल्यासारखे वागणे आणि ताजमहालाचे उदाहरण देणे हे त्‍यांना शोभत नाही.

पूर्वी कलाकारांना विश्‍‍वासात घेऊन कला अकादमीचे काम केले जायचे, त्यांच्या सूचना लक्षात घेऊन बदल केले जायचे. परंतु आता तसे होत नाही, अशी खंतही त्‍यांनी व्यक्त केली.

युगांक नायक म्‍हणाले, काल झालेल्‍या बैठकीला एक एक कलाकार म्हणून मीसुद्धा उपस्थित होतो. कला अकादमीचा विषय अनेक वर्षांपासून सुरू आहे. तेथे डागडुजी करून अनेक सुधारणा करण्‍यात आल्‍या. तेव्‍हा किती कलाकारांनी प्रश्‍‍न उपस्‍थित केले?

केवळ कलाकाराचा बुरखा पांघरून विशिष्ट पद्धतीने मंत्री गोविंद गावडे यांना टार्गेट करण्याचा हा प्रकार आहे व तो बरोबर नाही. कला अकादमीतील ध्‍वनियंत्रणा आणि इतर तांत्रिक बाबी या त्‍या-त्‍या लोकांनी सोडवायला हव्‍यात. त्याबाबत इतरांना दोष देत राहणे चुकीचे आहे, असेही नायक म्‍हणाले.

कला-संस्‍कृती खात्‍याचा मनमानी कारभार : मोघे

कला आणि संस्कृती खाते मनमानीपणाने वागत आहे. कलाकारांना कधीच विश्‍‍वासात घेतले जात नाही. कला अकादमीच्‍या नूतनीकरणानंतर मंत्री गोविंद गावडे यांनी तेथे पहिला स्‍वत:चा नाट्यप्रयोग सादर केला. परंतु त्याच वर्षी महाराष्ट्रात प्रथम पुरस्कारप्राप्त गोमंतकीय नाटकाला त्‍यांना संधी दिली नाही. सरकारी पदावर असल्याने नाटकाला लाखो रुपये मिळतात, तसे ते इतर नाटकांना का मिळत नाहीत? असा सवाल ज्ञानेश मोघे यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT