Goa Minor Girl Sexual Assault Dainik Gomantak
गोवा

Goa Minor Girl Sexual Assault: गोवा हादरला! 15 वर्षीय मुलीवर 2 वर्षांपासून अत्याचार, 23 वर्षीय नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांच्या तपासाची चक्रे फिरली

Minor Girl Sexual Assault Case Verna: एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी बायणा येथील एका 23 वर्षीय तरुणाविरुद्ध 'पोक्सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

Manish Jadhav

वेर्णा: गोव्यात एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली. एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी बायणा येथील एका 23 वर्षीय तरुणाविरुद्ध 'पोक्सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे सांकवाळ आणि वेर्णा परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अत्याचाराचा प्रकार एप्रिल 2024 पासून मार्च 2026 या कालावधीत वेळोवेळी घडला. आरोपीने पीडित मुलगी (Girl) अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिच्या असहायतेचा फायदा घेत तिला आपल्या जाळ्यात ओढले आणि तिच्यावर वारंवार अत्याचार केले. पीडितेच्या आईने सांकवाळ येथून वेर्णा पोलीस ठाण्यात धाव घेत नराधम आरोपीविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली.

दुसरीकडे, वेर्णा पोलिसांनी तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तपास चक्रांना गती दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांसह लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण करण्याचे अधिनियम अर्थात 'पोक्सो' कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला. आरोपीचे वय 23 वर्षे असून तो मूळचा बायणा, वास्को येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा सखोल तपास सुरु असून आरोपीला लवकरात लवकर बेड्या ठोकण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

अल्पवयीन मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणातील पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिचा जबाबही नोंदवून घेण्यात आला. वेर्णा (Verna) पोलीस स्थानकाचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. आरोपीने अशाच प्रकारे अन्य कोणाची फसवणूक केली आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास वेर्णा पोलीस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhagwan Mahavir: धुक्यात हरवलेले जंगल, फेसाळणारा दूधसागर आणि वन्यजीवांचा थरार; पावसात नक्की भेट द्या गोव्याच्या 'या' अभयारण्याला

डिचोली बाजारात वीजवाहिन्यांचा धोका; 'स्पार्क'मुळे व्यापारी भयभीत, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Goa Sports Complex: कांपाल क्रीडा, व्यापारी सुविधा भाडेपट्टीवर; खासगी संस्थेमार्फत चालविण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Goa Athletics Championship: राज्यस्तरीय ॲथलेटिक्सला मोठा प्रतिसाद; मनोहर पर्रीकर स्मृती स्पर्धेत 2 हजार ॲथलीट्सचा सहभाग अपेक्षित

VIDEO: शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची एन्ट्री; पाकिस्तानचा खरा चेहरा उघड! व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT