Verna Police Dainik Gomantak
गोवा

Verna Police: दुचाकी चोरणाऱ्या 2 युवकांना अटक; दोघेही परप्रांतीय

वेर्णा पोलिसांची कारवाई

गोमंतक ऑनलाईन टीम

Verna Police Arrested Scooter Thief: वेर्णा पोलिसांनी दोघा परप्रांतीय दुचाकी चोरट्यांना अटक केली आहे. सोहेल फिरोज शेख (वय 19), बलराम शंकर दास (वय 22) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून तीन दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत.

यापैकी शेख हा मूळचा कर्नाटकचा आहे. तर दास हा मूळचा पश्चिम बंगालमधील कोलकात्याचा आहे.

सध्या हे दोघेही संशयित वेर्णा येथे राहत होते. त्यांनी विविध ठिकाणांहून तीन दुचाकी चोरल्या होत्या. पैकी 02 अॅक्सेस आणि 1 अॅक्टिव्हा आहे. या तिन्ही गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पोलिस या चोरट्यांच्या मागावर होते. त्यासाठी वेर्णा पोलिसांनी एक पथक स्थापन केले होते. पोलिसांनी पाळत ठेऊन, सापळा रचून या संशयित चोरट्यांना पकडल्याची माहिती आहे. त्यांच्याकडे इतरही दुचाकी चोऱ्यांबाबत पोलिस तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tilak Varma: आशिया कपमध्ये कमाल, आता तिलक वर्मा करणार कॅप्टन्सी! टीमची झाली घोषणा; पाहा संपूर्ण संघ

BJP Rath Yatra Goa: भाजपतर्फे 25 डिसेंबरपर्यंत रथयात्रा, पदयात्रा; मतदारसंघनिहाय मेळावे होणार, स्वदेशीचा नारा करणार बुलंद

PM Surya Ghar Scheme:'पीएम सूर्य घर मुफ्‍त बिजली'च्या जागृतीला चालना, उत्तर गोवा जिल्हा समन्वय समितीच्‍या बैठकीत निर्णय

Pernem: शेतकऱ्यांसाठी घातक असलेला कायदा बदला, कुळ मुंडकार संघर्ष समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Mhaje Ghar: 'माझे घर'चे अर्ज सोमवारपासून उपलब्ध; योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा, CM प्रमोद सावंतांच्या अधिकाऱ्यांना सूचना

SCROLL FOR NEXT