Goa Kidnapping Case  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात गुन्हेगारीचा आलेख चढताच! अल्पवयीन मुलीच्या अपहरणात वेर्णा पोलिसांची कारवाई

सुदैवाने अपहरण प्रकरणातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. यातून अपहरण केलेल्या पीडितेची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

गोव्यात दिवसेंदिवस हत्या, अपहरण, चोरी अशा सर्वच प्रकारच्या गुन्ह्यात वाढ होत आहे. गोवा पोलीस प्रशासन 24 तास सतर्क असूनही हे गुन्हे घडत आहेत.

नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. मात्र सुदैवाने अपहरण प्रकरणातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. यातून अपहरण केलेल्या पीडितेची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांच्या मदतीने वेर्णा पोलीस निरीक्षक डायगो ग्रेसियास यांनी कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. (Verna police action in abduction of minor girl)

दरम्यान, एका 11 महिन्याच्या अल्पवयीन मुलाच्या अपहरण प्रकरणाचा 24 तासांच्या आत छडा लावण्यास वास्को पोलिसांना यश आले. आरोपी दीपक यादव (लंगडा) व श्रीमती काणी या दोघा आरोपींना माहीम मुंबई येथे मुलासह ताब्यात घेतले व त्यांना अटक करण्यात आली.

वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वास्कोत साईबाबा मंदिराजवळ फूटपाथवर राहणाऱ्या उत्तर कर्नाटकातील एका महिलेने काल पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी 11 रोजी 5 ते 4:30 च्या दरम्यान दीपक यादव ( लंगडा) आणि काणी या वास्को येथे फूटपाथवर राहणाऱ्या दोघा आरोपींनी तिच्या ताब्यातून तिचे 11 महिन्याच्या बाळाचे अपहरण केल्याची तक्रार दाखल केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT