Verna Accident Dainik Gomantak
गोवा

Accident: वेर्णा राष्ट्रीय महामार्गावर अपघात; ट्रेलर दुभाजक तोडून झाला आडवा

सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली; वाहतूक मात्र ठप्प

दैनिक गोमन्तक

वास्को: वेर्णा येथे हुंडाई शोरूम समोर मुख्य राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रेलरचा टायर फुटला व दुभाजक तोडून दुसऱ्या बाजूला रस्त्यावर आडवा झाल्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक रहदारी ठप्प झाली व राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम झाला.

(verna national highway trailer accident blocked traffic)

संध्याकाळी 5:30 च्या दरम्यान ट्रेलर ट्रक वेर्णाहून मडगावच्या दिशेने जात असताना हुंडाई शोरूमकडे पोहोचताच ट्रेलरचा टायर फुटला. यात ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने ट्रेलर रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर चढला व दुभाजक तोडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने रस्त्याच्या मधोमध आडवा राहिला.

ट्रेलर दोन्ही बाजूकडे रस्त्यावर आडवा राहिल्याने वाहतूक रहदारी ठप्प झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वेर्णा पोलिस स्थानकाचे निरीक्षक डायगो ग्रेसियस यांनी सांगितले. या राष्ट्रीय महामार्गावर शेकडो वाहनांची वर्दळ असते, तसेच संध्याकाळी 5:30 वाजता औद्योगिक वसाहतीतील कंपनी कामगारांची सुटण्याची वेळ असते. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावर खूप वर्दळ चालू असते.

दैव बलवत्तर म्हणून यावेळी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. यावेळी वास्को वाहतूक पोलीस स्थानकाचे निरीक्षक शैलेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी मडगावहून येणारी वाहतूक रहदारी तसेच कुठ्ठाळी, वास्कोहून येणारी वाहतूक रहदारीवर नियंत्रण आणून वाहतूक ग्रह सुरळीत सोडली सुमारे एक तासाने वाहतूक रहदारी सुरळीत करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT