Garbage Problem in Verna Dainik Gomantak
गोवा

कचरा प्रक्रिया प्रकल्पाला वेर्णा परिसरातही विरोध

174 बोअर विहिरी, 32 नैसर्गिक पाण्याचे झरे तसेच 28 विहिरी नष्ट होण्याची भीती

दैनिक गोमन्तक

पणजी : वेर्णा येथील नागरिकांनी गुरुवारी गोवा सोलि़ड व्हेस्ट मॅनेडमेंट कोर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन वेर्णा येथे कचरा प्रक्रिया प्रकल्पाला विरोध दर्शविला. हा प्रकल्प वेर्णा येथे सुरु केल्यास येथील 174 बोअर विहिरी, 32 नैसर्गिक पाण्याचे झरे तसेच 28 विहिरी नष्ट होतील अशी भीती नागरीकांनी व्यक्त केली.

तत्पुर्वी हे नागरिक कचरा व्यवस्थापन मंत्री बाबुश मोन्सेरात यांना भेटले आणि त्यांनी बाबूश यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. गेल्या महिन्यात झालेल्या ग्रामसभेतही नागरिकांनी कचरा प्रक्रिया प्रकल्पाला विरोध करण्याचा निर्णय घेतला होता. मंत्र्यांनी या नागरिकांना जीएसडबल्यूएमसीच्या अधिकाऱ्यांना भेटण्यास सांगितले. तसेच या अधिकाऱ्यांना वेर्णा औद्योगिक वसाहतीतील प्रस्तावित कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे त्यांना सादरीकरण करुन दाखविण्यास सांगितले. मात्र हे सादरीकरण पाहूनही नागरिक समाधानी झाले नाहीत.

या प्रकल्पाबद्दल लोकांच्या मनात भीती आहे. तसेच काही प्रश्नही आहेत, जे आम्ही अधिकाऱ्यांसमोर मांडले आहेत असे जॉन फिलीप परेरा याने सांगितले. मात्र जीएसडबल्यूएमसीचे व्यवस्थापकीय संचालक लेविसन मार्टिन्स आमच्या बोअर विहिरी, झरे आणि विहिरी संदर्भातील प्रश्नांना समर्पक उत्तर देऊ शकले नाहीत, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: मोठी बातमी! गोव्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू

बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाने गाठले, परदेशातून लग्नासाठी गोव्यात आलेल्या ‘लिओ’चा अपघाती मृत्यू

VIDEO: "वेळीच सुधारणा केली नाही तर..." चौथ्या टी-20 सामन्यापूर्वी गौतमचा शुभमन गिलला 'गंभीर' इशारा! सरावादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल

गोव्यात आता प्राण्यांसाठी एक्स – रे , सोनोग्राफी सुविधा; सोनसोडो – राय येथे लवकरच सुरु होतोय पशु वैद्यकीय दवाखाना

Bicholim: अखेर डिचोली बाजारातील पाण्याची गळती बंद, फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती; 'नवा सोमवार'पूर्वी पाण्याची समस्या सुटणार

SCROLL FOR NEXT