Case Dainik Gomantak
गोवा

Verna IDC Accident: बसखाली सापडून बिहारी कामगारांचा मृत्यू! 3 मजुरांच्या वारसांना 13 लाखांची भरपाई द्या; आयुक्तांचा आदेश

Verna IDC Bus Accident Death: बिहारमधील कामगार आयुक्तांना पत्र पाठवण्यात आले होते. कुणीच त्यांच्या वारसांना शोधू शकले नाही. यामुळे भरपाईची रक्कम सरकारी गंगाजळीत जमा होण्याची वेळ आली होती.

Sameer Panditrao

पणजी: वेर्णा औद्योगिक वसाहतीमध्ये २५ मे रोजी रात्री बसखाली सापडून मृत्यूमुखी पडलेल्या चार मजुरांपैकी तीन मजुरांच्या वारसांना प्रत्येकी १३ लाख ६० हजार रुपयांची भरपाई द्यावी, असा आदेश आज कामगार आयुक्त डॉ. लेविन्सन मार्टिन्स यांनी जारी केला. ३० दिवसांत ही भरपाई अदा न केल्यास १२ टक्के व्याजासह ती द्यावी लागेल, असेही त्यांनी आदेशात नमूद केले आहे.

त्यांनी हा आदेश कुद्रोली बिल्डर्स अॅण्ड इन्फास्ट्रक्चर्स आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे विभाग १४ च्या कार्यकारी अभियंत्यावर बजावला आहे. त्यांनी रमेश महातो, विनोदसिंह, राजेंद्र महातो यांच्या वारसांना भरपाई द्यायची आहे. मजूर अनिल महातो याच्या वारसांना भरपाई देण्याविषयी कामगार आयुक्त सोमवारी निर्णय घेण्याची शक्यता आहे.

त्या मजुरांच्या वारसांना शोधण्याचा प्रयत्न आधी फोल ठरला होता. बिहारमधील कामगार आयुक्तांनाही पत्र पाठवण्यात आले होते. कुणीच त्यांच्या वारसांना शोधू शकले नाही. यामुळे भरपाईची रक्कम सरकारी गंगाजळीत जमा होण्याची वेळ आली होती.

डॉ. मार्टिन्स गरीब कुटुंबीयांना आपण मदत देऊ शकत नाही, असा विचार करून व्यथित झाले होते. त्यांनी ही सल आपल्या एका मित्राला बोलून दाखवली. त्या मित्राने सामाजिक कार्यकर्ते कुमार कलानंद मणी यांच्या कानी घातली. याआधी एका कंपनीतील स्फोटात मरण पावलेल्या महाराष्ट्रातील दोन कामगारांना प्रत्येकी १२ लाख रुपयांची भरपाई डॉ. मार्टिन्स यांनी मिळवून दिली होती.

मजुरांच्या कुटुंबीयांचा शोध

हे सर्व मजूर बिहारमधील होते. बस अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर कामगार आयुक्त डॉ. लेविन्सन मार्टिन्स यांनी या मजुरांच्या वारसांचा शोध घेण्यासाठी बिहारमध्ये विशेष मोहीम राबवली. सामाजिक कार्यकर्ते कुमार कलानंद मणी यांच्या मदतीने स्थानिक सामाजिक कार्यकर्ता अभिषेक कुमार यांच्याशी संपर्क साधून ते वारसांना शोधण्यात यशस्वी झाले. त्यानंतर २४ मे रोजी कुटुंबीय गोव्यात दाखल झाले आणि भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT