fire in hughes precision factory verna Dainik Gomantak
गोवा

Verna: वेर्णा दुर्घटनेत 250 किलो दारुगोळा जळून नष्‍ट, प्राथमिक अंदाज; केंद्रीय गृहमंत्रालयाला जाणार अहवाल

Verna factory fire: शनिवारी झालेल्‍या या आगीच्‍या दुर्घटनेत या कारखान्‍यात असलेला सुमारे २५० किलो दारुगोळा जळून नष्‍ट झाला असा प्राथमिक अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे.

Sameer Panditrao

मडगाव: वेर्णा येथे ह्युजेस प्रेसिजन या काडतुसे बनविणाऱ्या कारखान्‍यात शनिवारी जी आग लागण्‍याची घटना घडली, त्‍यासंदर्भात लवकरच केंद्रीय गृहमंत्रालयाला जिल्‍हा प्रशासनाकडून अहवाल दिला जाणार आहे, अशी माहिती दक्षिण गोव्‍याच्‍या जिल्‍हाधिकारी ॲग्‍ना क्‍लिटस यांनी दिली.

शनिवारी झालेल्‍या या आगीच्‍या दुर्घटनेत या कारखान्‍यात असलेला सुमारे २५० किलो दारुगोळा जळून नष्‍ट झाला असा प्राथमिक अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे. सध्‍या या कारखान्‍यातील उत्‍पादन बंद ठेवण्‍यात आले आहे.

या कारखान्‍यात बंदुकीला लागणारी काडतुसे बनविली जात असून त्‍यासाठी या दारुगोळ्याचा वापर केला जात होता. शनिवारी पहाटे अकस्‍मात या कारखान्‍याला आग लागण्‍याची घटना घडली. विजेच्‍या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्‍यक्‍त करण्‍यात आला होता. त्‍यानंतर या दुर्घटनेची दक्षिण गोवा जिल्‍हा प्रशासनाने चौकशी सुरू केली हाेती.

सुरक्षेच्या उपायांसंदर्भात चौकशी

वेर्णा पोलिस स्‍थानकाचे निरीक्षक आनंद शिरोडकर यांनीही या दुर्घटनेनंतर या कारखान्‍यात जाऊन चौकशी केली हाेती. आत्तापर्यंत आम्‍हाला जी प्राथमिक माहिती मिळाली, त्‍याप्रमाणे सुमारे २५० किलो दारुगोळा त्‍यावेळी या कारखान्‍यात होता. त्‍याशिवाय काडतुसांची कित्‍येक रिकामी खोकी कारखान्‍यात होती. हा माल हाताळताना या कारखान्‍याने पुरेसे सुरक्षेचे उपाय घेतले होते का याचीही चौकशी आम्‍ही करत आहोत. अग्निशमन दलाकडूनही यासंदर्भात वेगळी चौकशी केली जाणार असल्‍याची माहिती त्‍यांनी दिली.

गृहमंत्रालयाला पाठवणार अहवाल

जिल्‍हाधिकारी क्‍लिटस म्हणाले, की सुरुवातीला आम्‍ही इंधन आणि स्‍फोटक सुरक्षा (पेसो) मंडळाकडे संपर्क साधला होता. मात्र, या कंपनीला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून परवाना मिळाला असल्‍याने यासंबंधीची चौकशी गृहमंत्रालयाच्‍या अखत्‍यारित येत असल्‍याने आम्‍ही आमचा अहवाल मंत्रालयाला पाठविणार अशी माहिती त्‍यांनी दिली. यापूर्वी याच कंपनीच्‍या बेतूल येथील गोदामाला आग लागली होती. त्‍यावेळी त्‍या दुर्घटनेवेळी या गोदामात सुमारे ११ टन दारुगोळा साठवून ठेवला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: किंग कोहलीची बॅट 'फायर' मोडवर...! विराटच्या निशाण्यावर मोठा ऐतिहासिक रेकॉर्ड; सलग तिसरे वनडे शतक ठोकण्याची सुवर्णसंधी

Partgali Banyan Tree: 1000 वर्षे जुना, तळपण नदीच्या उजव्या काठावरती वसलेला, पर्तगाळी येथील 'पवित्र वटवृक्ष'

Serendipity Art Festival: क्ले‌ प्ले, मोटाऊन मॅडनेस, रिफ्लेट! 'सेरेंडिपीटी'त अनुभवा जादुई सादरीकरणे

Abhang Repost: ‘चल ग सखे... पंढरीला'! म्‍हापशात ‘अभंग रिपोस्‍ट’चा जल्लोष; भक्तिरसात न्हाले शहर

World Soil Day: चिंताजनक! 2045 पर्यंत पृथ्वीवर 40% कमी अन्न तयार होण्याची शक्यता; गोव्यासमोरही मोठी समस्या..

SCROLL FOR NEXT