Verna: गोदामानंतर कंपनीतही आग, ‘ह्युजेस’मुळे औद्योगिक वसाहत असुरक्षित; वेर्णा परिसरात भीती

Verna Fire News: वेर्णा औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या ह्युजेस प्रेसिजन या बंदुकीसाठी काडतुसे बनवणाऱ्या कारखान्याला आग लागण्याची घटना घडल्याने सगळेच भयभीत झाले आहेत.
fire in hughes precision factory verna
fire in hughes precision factory vernaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: वेर्णा औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या ह्युजेस प्रेसिजन या बंदुकीसाठी काडतुसे बनवणाऱ्या कारखान्याला आग लागण्याची घटना घडल्याने सगळेच भयभीत झाले आहेत. यापूर्वी याच कंपनीच्या बैतूल येथे असलेल्या गोदामाला काही महिन्यापूर्वी अशीच आग लागली होती.

त्यामुळे या गोदामात साठवून ठेवलेल्या दारूगोळ्याने पेट घेतला होता. आता पुन्हा एकदा या कंपनीच्या मुख्य कारखान्यालाच आग लागण्याची घटना घडल्याने ही कंपनी या संपूर्ण औद्योगिक वसाहतीसाठी सुरक्षित आहे का? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या कारखान्यात काडतुसे बनविण्यासाठी दारूगोळ्याचा वापर केला जातो. त्यामुळे या कारखान्यात अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी कंपनीने सुरक्षेचे पूर्ण उपाय घेतले होते का? याचा तपास आता जिल्हा प्रशासनाकडून केला जात आहे.

ही आग लागली त्यावेळी या कारखान्यात नेमका किती दारूगोळा साठवून ठेवला होता. ही साठवणूक सुरक्षित वातावरणात केली होती का? याचा आम्ही तपास करत आहोत, अशी माहिती या घटनेची चौकशी करणारे सासष्टीचे उपजिल्हाधिकारी गणेश बर्वे यांनी दिली.

या कारखान्यात किती दारूगोळा होता याची माहिती कंपनीकडून जाणून घेण्यासाठी माल खरेदी केलेल्या सर्व कागदपत्रांची माहिती घ्या असा आदेश बर्वे यांनी काल वेर्णा पोलीस आणि आणि वेर्णा अग्निशमन दलाला दिला आहे अशी माहिती बर्वे यांनी दिली.

fire in hughes precision factory verna
Nakerim Betul: बेतुल स्फोट दुर्घटनेची फाईल अडकली लालफितीत, कंपनी​चा गोदाम परवाना रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती

काल बर्वे यांनी या कारखान्याची पाहणी केली असता, ही आग विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी अशी माहिती कारखान्यातील अधिकाऱ्यांनी दिली होती. ज्या ठिकाणी आग लागली तिथे पुठ्ठ्याची मोठ्या प्रमाणावर खोकी ठेवण्यात आली होती. ज्या ठिकाणी दारूगोळा साठवून ठेवला जातो ते ठिकाण पूर्णतः फायरप्रूफ असण्याची गरज असते, त्यामुळे या ठिकाणी खोकी साठवून ठेवून कंपनीने हलगर्जीपणा कसा केला हा सवाल उपस्थित होत असून प्रशासनही त्याच दृष्टीने तपास करत आहे.

fire in hughes precision factory verna
Nakerim Villagers Protest: नाकेरी येथे 'ह्यूज प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला स्थानिकांचा विरोध

सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष!

काही महिन्यापूर्वी याच कंपनीच्या बेतूल येथील दारूगोळा साठवून ठेवलेल्या गोदामाला आग लागून मोठा स्फोट झाला होता. त्यावेळी जिल्हा प्रशासनाने केलेल्या चौकशीत या कंपनीने सुरक्षेचे आवश्यक असलेले उपाय घेतले नव्हते, हे दिसून आले होते.

त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा गोदाम चालविण्यासाठी जो ‘ना हरकत दाखला’ दिला होता, तो रद्द केला होता. या घटनेनंतर परत एकदा याच कंपनीच्या मुख्य कारखान्याला आग लागल्याने या बाबीकडे सध्या सगळेच जण गांभीर्याने पाहू लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com