Cipla Verna Goa news 18
गोवा

Cipla Verna Accident: वेर्णा दुर्घटनेतील कामगारांना सोळा लाखांची भरपाई; कामगार आयुक्तालयाचा आदेश

Cipla Goa: सुनावणीदरम्यान कंपनीने भरपाई देण्याचे मान्य करत धनादेशाद्वारे रक्कम कामगार आयुक्तांकडे जमा केली होती

गोमन्तक डिजिटल टीम

Cipla Accident

पणजी: वेर्णा येथील सिप्ला लिमिटेड या कंपनीत झालेल्या अपघातात मरण पावलेल्या अक्षय विठ्ठल पाटील आणि अक्षय भीमराव पवार यांच्या कायदेशीर वारसांना कामगार आयुक्तालयाने कंपनीकडून भरपाई मिळवून दिली आहे.

कामगार आयुक्त डॉ. लेविन्सन मार्टिन्स यांनी पाटील याचे वडील विठ्ठल पाटील यांना भरपाईपोटी १६ लाख १४ हजार ६०० रुपये, तर पवार याचे वडील भीमराव पवार यांना १६ लाख ४९ हजार ६२५ रुपये देण्याचा आदेश आज जारी केला. ही रक्कम कंपनीने कामगार आयुक्तालयाकडे धनादेशाच्या स्वरूपात जमा केली होती.

या दोघांच्या अंत्यसंस्काराच्या खर्चापोटी प्रत्येकी पाच हजारांचा धनादेशही देण्याचा आदेश जारी केला आहे. सिप्ला कंपनीत २५ जुलै रोजी हा अपघात झाला होता. याची माहिती कामगार आयुक्त कार्यालयाला मडगावच्या उपायुक्त कार्यालयाकडून मिळताच भरपाईसाठी संबंधितांना नोटीसा जारी केल्या होत्या. त्यानंतर १३ ऑगस्ट रोजी संबंधितांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी सुनावणीही घेण्यात आली. या सुनावणीदरम्यान कंपनीने भरपाई देण्याचे मान्य करत धनादेशाद्वारे रक्कम कामगार आयुक्तांकडे जमा केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT