Vasco Accident Dainik Gomantak
गोवा

Verna Accident: मद्यपी चालकाचा ताबा सुटला, दुचाकीवरून दोघे फेकले गेले; वेर्णा येथील अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Goa Accident: वेर्णा येथे युनियन बँकेसमोर रविवारी (ता. २७) दुपारी झालेल्या स्वयंअपघातात दुचाकीच्‍या मागे बसलेला मिथुन कुमार रावनी (३०) हा युवक जागीच ठार झाला.

Sameer Panditrao

वास्को: वेर्णा येथे युनियन बँकेसमोर रविवारी (ता. २७) दुपारी झालेल्या स्वयंअपघातात दुचाकीच्‍या मागे बसलेला मिथुन कुमार रावनी (३०) हा युवक जागीच ठार झाला.

तर, दुचाकीचालक रितेश बेडिया (३०) हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्‍यात आले आहे. त्‍याने मद्यप्राशन केले होते.

वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे झारखंडचे परंतु कामानिमित्त वेर्णा येथे राहणारे रितेश बेडिया व मिथुन कुमार रावनी दुपारी मोटरसायकलने मडगावहून वेर्णा चर्चकडे चालले होते.

दुचाकीस्‍वार रितेश याने मद्यप्राशन केले होते. तरीसुद्धा त्‍याने आपल्यासोबत मिथुनला घेतले. दोघेही वेर्णा येथे युनियन बँकेसमोर पोहोचले असता रितेशचा दुचाकीवरील ताबा सुटला व ते दोघेही रस्त्यावर फेकले गेले.

या अपघातात मिथुन कुमार याला गंभीर इजा झाल्‍याने तो जागीच ठार झाला. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून रितेश बेडिया याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाच्या दुर्दशेवर तरुण अभियंत्याचा अनोखा 'सत्याग्रह'; म्हणाला, 'लाखो कोटींचा निधी जातोय तरी कुठं...'

Mumbai-Goa Highway: 'जिकडे-तिकडे हायवेवर खड्डे, गणराया मी गावी येऊ कसे...'; मुंबई-गोवा महामार्गाचा व्हिडिओ व्हायरल!

50 रुपयांची ट्रिक Rapido ला पडली महागात; भ्रामक जाहिरातींमुळे ठोठावला 10 लाखांचा दंड

Ganesh Festival 2025: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी खूशखबर! मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना घातली बंदी

मोडकळीस आलेले घर अन् तुटलेले छत, अखेर मिळाला प्रेमाचा निवारा; 80 वर्षीय निराधर आजीच्या मदतीला धावले प्रशासन

SCROLL FOR NEXT