Verna Accident Dainik Gomantak
गोवा

Verna Accident: वेर्णा येथे भरधाव एसयूव्ही कारची 2 विद्यार्थीनींना धडक; 1 जागीच ठार

Goa Road Accident: वेर्णा माँजीनीसजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या एसयूव्ही कारने दोन विद्यार्थिनींना धडक दिल्याने एकीचा जागीच मृत्यू झाला असून दुसरी विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे.

Sameer Amunekar

वेर्णा: वेर्णा माँजीनीसजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या एसयूव्ही कारने दोन विद्यार्थिनींना धडक दिल्याने एकीचा जागीच मृत्यू झाला असून दुसरी विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे. मृत विद्यार्थिनीचे नाव अनिषा बोरकर (वय २३, रा. केपे) असे असून, जखमी झालेल्या विद्यार्थिनीचे नाव अक्षता नाईक (रा. कारवार) असे आहे.

सदर घटना शनिवारी (३१ मे) घडली. अनिषा आणि अक्षता या दोघी रस्त्याने पायी चालत असताना भरधाव वेगाने आलेल्या एसयूव्हीने त्यांना जोरदार धडक दिली.

या अपघातात अनिषा हिला गंभीर दुखापत होऊन तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अक्षता नाईक ही जखमी झाली असून तिच्यावर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर संबंधित कार चालकाने स्वतः वेर्णा पोलिस स्थानकात हजेरी लावली असून, त्याने घडलेल्या अपघाताची कबुली दिली आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कार चालवणारा तरुण पीसीसी कॉलेजचा विद्यार्थी असल्याचं स्पष्ट झालं आहे. वेर्णा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT