Arrest Dainik Gomantak
गोवा

Verca Crime: युवकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण, सळ्यांनी वार; वार्का अपहरण प्रकरणातील फरारी संशयिताला अटक

Goa Crime: ही अपहरणाची घटना १९ सप्टेंबर २०२४ या दिवशी घडली होती. वॉल्टर आणि त्याच्या अन्य साथीदारांनी त्या युवकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

Sameer Panditrao

मडगाव: वार्का येथे एका हॉटेलबाहेर झालेल्या वादानंतर एका युवकाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करून नंतर एकीकडे सोडून देण्याच्या आरोपाखाली कोलवा पोलिसांना हवा असलेला मुख्य संशयित वॉल्टर फर्नांडिस (वय ३६, राय) याच्यासह त्याचा साथीदार युवकेश सिंग बदयला (वय १८, पाजीफोंड - मडगाव) या दोघांना अटक केली.

ही अपहरणाची घटना १९ सप्टेंबर २०२४ या दिवशी घडली होती. वॉल्टर आणि त्याच्या अन्य साथीदारांनी त्या युवकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, तर काही जणांनी त्याच्यावर सळ्यांनी वार केले होते. नंतर त्याला एका गाडीत कोंबून त्याचे अपहरण केले होते.

नंतर त्याला एका ठिकाणी टाकून देऊन हल्लेखोर फरार झाले होते. त्यापैकी एका संशयिताला पोलिसांनी अटक केली होती, पण इतर संशयित फरार झाले होते.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित वॉल्टर फर्नांडिस याची पार्श्वभूमी गुंड प्रवृत्तीची असून त्याच्या विरोधात यापूर्वी कोलवा पोलिसात दोन, तर फातोर्डा पोलिस स्थानक आणि मायणा कुडतरी पोलिस स्थानकात प्रत्येकी एक गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT