Sankhalim Muncipality Election 2023: साखळी नगरपालिका क्षेत्रातील विकासाचे चित्र पाहता विद्यमान पालिका मंडळ सपशेल अपयशी ठरले आहेत.
आता लोकांना बदल हवा आहे आणि आम आदमी पक्ष तो देणार आहे, असे या पक्षाचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी सांगितले.
साखळीत स्थानिक व स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार रिंगणात उतरविणार आहे. नगरपालिका निवडणूक पक्षपातळीवर होत नसली तरी ती तशी करण्याच्या भाजप व मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेचा आपण निषेध करीत आहे, असे आमदार व्हिएगस म्हणाले.
साखळी पालिका गेली दहा वर्षे काँग्रेसकडे आहे. या पक्षाने साखळीचा किती विकास साधला ते दिसून येतच आहे. तसेच राज्यात भाजपची सत्ता असतानाही त्यांना ही पालिका आपल्याकडे ठेवता आली नाही.
त्यामुळे या दोन्ही पक्षांकडे यापुढे ही पालिका देऊन फायदा नाही. त्यासाठी स्वतंत्र पर्याय म्हणून ‘आप’ साखळीत लोकांसमोर येणार आहे. सर्व उमेदवार हे स्थानिकच असतील. राज्याबाहेरील किंवा सीमेवरील उमेदवार नसतील, असेही व्हिएगस यांनी स्पष्ट केले.
"लोकांना साखळीत बदल हवा आहे. तो घडविताना साखळीकरांना अपेक्षित विकास आम्ही देणार आहोत. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. त्या दिवशी चित्र स्पष्ट होईल."
- व्हेंझी व्हिएगस, ‘आप’चे आमदार
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.