Cashew Festival Goa 2023: काजू महोत्सव पर्यटकांसाठी आकर्षण : दिव्या राणे

उत्पादकांना प्रोत्साहन देणारा महोत्सव दरवर्षी करणार आयोजित
Cashew Festival Goa 2023
Cashew Festival Goa 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Cashew Festival Goa 2023: राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना आणि पूरक व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी वन विकास महामंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या काजू महोत्सवाला राज्यभरातून तसेच पर्यटकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

महोत्सव अनेकांसाठी संस्मरणीय ठरला. विविध उपक्रम आणि फटक्‍यांच्या आतषबाजीत महोत्सवाची सांगता झाली.

महोत्सवाच्या समारोप प्रसंगी महामंडळाच्या अध्यक्षा आमदार डॉ. दिव्या राणे उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केल्याप्रमाणे दरवर्षी हा महोत्सव विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनिशी आयोजित करण्यात येणार आहे.

Cashew Festival Goa 2023
Amit Shah In Goa : शहांच्या सभेद्वारे ‘भाजप’ने फुंकले रणशिंग; तयारी लोकसभेची

राज्यातील काजू उत्पादक शेतकरी आणि पूरक व्यावसायिकांच्या मालाला बाजारपेठ मिळावी हा यामागील प्रमुख उद्देश आहे.

महामंडळाच्या वतीने नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नव्या जातींची कलमे लावून काजूचे उत्पादन वाढविण्यात येईल. यासाठी महामंडळाच्या वतीने विविध प्रयत्न करण्यात येतील.

दरम्यान, कांपाल येथील बांदोडकर मैदानावर रविवारी काजू महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. दुपारी 3 वाजता काजू उत्पादन वाढीसाठी विविध तज्ज्ञांनी उत्पादकांना मार्गदर्शन केले.

Cashew Festival Goa 2023
Vijai Sardesai : गोव्याचा काजू उद्योग वाचवा, असे का म्हणाले सरदेसाई?

संगीतावर पर्यटकांचा ठेका

गोव्याची सुप्रसिद्ध गायिका लोर्ना यांच्या संगीताने उपस्थित मंत्रमुग्ध झाले. त्यांनी सादर केलेल्या कोकणी गीतांवर पर्यटकांनी ताल धरला.

त्यानंतर प्रसिद्ध डिझायनर वेर्मा डिमेलो यांचा कलेक्शनचा फॅशन शो झाला. प्रसिद्ध पार्श्वगायक स्टेबिन बेन यांनी सादर केलेल्या गीतांनाही रसिकांनी डोक्यावर घेतले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com