Panaji Fish Market Dainik Gomantak
गोवा

Panjim Fish Market: इमारत धोकादायक बनल्याने सात मांस विक्रेत्यांची दुकाने सील; विक्रेत्यांची गोवा खंडपीठात धाव

Panaji Fish Market: खंडपीठाने पणजी महापालिकेला नोटीस बजावून या विक्रेत्यांच्या पुनर्वसनासाठी पर्यायी तोडगा काढण्याची सूचना करत ही सुनावणी आता पुढील आठवड्यात ठेवली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पणजी मासळी मार्केटमधील इमारत धोकादायक बनल्याने तेथील सात मांस विक्रेत्यांची दुकाने पणजी महापालिकेने सील केली. याविरुद्ध त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेतली आहे. खंडपीठाने पणजी महापालिकेला नोटीस बजावून या विक्रेत्यांच्या पुनर्वसनासाठी पर्यायी तोडगा काढण्याची सूचना करत ही सुनावणी आता पुढील आठवड्यात ठेवली आहे.

पणजी मार्केटात मांस विक्रीची दुकाने असलेल्या मुस्ताक खतीब व इतर सहाजणांनी ही याचिका सादर केली आहे. याचिकेत गोवा राज्यसह पणजी महापालिका, तिसवाडी मामलेदार व पणजी तलाठीला प्रतिवादी करण्यात आले आहे.

पणजी महापालिकेने ३ जानेवारी २०२४ रोजी नोटीस पाठवून याचिकादारांना दुकाने खाली करण्याचे निर्देश दिले होते. त्यांची दुकाने असलेली इमारत धोकादायक असल्याचे कारण देण्यात आले होते. या इमारतीचा संरचनात्मक स्थिरता अहवाल सरकारी तंत्रनिकेतनने २४ फेब्रुवारी २०२३ मध्ये दिला होता. त्याच्या आधारावर ही नोटीस बजावण्यात आली होती.

या नोटिशीनंतर याचिकादारांनी पणजी महापालिका आयुक्तांना भेटून ते ही दुकाने खाली करण्यास तयार आहेत मात्र नवीन इमारत उभी राहील तोपर्यंत मार्केट परिसरातच पर्यायी त्यांना व्यवसाय करण्यास जागा द्यावी अशी विनंती करण्यात आली होती. मात्र त्याकडे लक्ष देण्यात आले नाही अचानक दोन दिवसांपूर्वी महापालिकेने ही दुकाने सील केली आहेत. त्यामुळे याचिकादारांचा उदारनिर्वाहाचे उत्पन्नच बंद झाले आहे. त्यामुळे महापालिकेला पर्यायी जागा देण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकादारांनी केली आहे.

याचिकादारांनी या दुकानांचा महापालिकेकडे या वर्षीचा व्यवसाय कर जमा केलेला आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून ते हा व्यवसाय करत असून त्याचा कर वेळोवेळी जमा करत आले आहेत. या दुकानांचा महापालिकेबरोबर करार केलेला आहे. महापालिकेने ही दुकाने सील करून त्यांना तेथून हटवण्याचा डाव आहे. या इमारतीच्या आत मासे कापण्याचा तसेच काही मासळी विक्रेते व्यवसाय करत आहेत. ही इमारत धोकादायक असल्यास बाजूला असलेले मासळी मार्केटही तेथून हटवायला हवे.

वर्षापूर्वीचा अहवाल!

सदर इमारत धोकादायक असल्याचा अहवाल एका वर्षापूर्वीचा आहे व तरीही इमारत उभी आहे. या इमारतीच्या संरचनात्मक स्थिरतेची तपासणी पणजी तलाठीने केली आहे. तो तांत्रिक अधिकारी नसल्याने त्याचा अहवाल बेकायदेशीर आहे. त्यामुळे महापालिकेने जारी केलेली नोटीस मागे घेऊन दुकानांचे सील काढण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकादारांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT