फोंडा पालिका Dainik Gomantak
गोवा

विक्रेत्यांची फोंडा पालिकेवर 'धडक'

दैनिक गोमन्तक

फोंडा: फोंडा नगरपालिकेने मार्केट संकुलाच्या एका बाजूकडील स्लॅबचे उरलेले काम सुरू केल्यामुळे मार्केट संकुलाकडे जाणारी वाट पूर्णपणे बंद झाली आहे. त्‍यामुळे गिऱ्हाईकच नसल्याने मार्केटमधील संतापलेल्या विक्रेत्यांनी आज फोंडा पालिकेवर धडक देत नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला. येत्या शुक्रवारपर्यंत ही वाट मोकळी करून देण्याचे आश्‍वासन पालिकेने यावेळी दिले. त्यानंतर या विक्रेत्यांनी आधी पदपथांवर अतिक्रमण केलेल्या विक्रेत्यांना हटवा, अशीही जोरदार मागणी केली.

फोंडा पालिकेच्या मार्केट संकुलाच्या एका बाजूला स्लॅब घालण्याचे काम सुरू आहे. हे काम संथगतीने सुरू असून त्‍यासाठी मार्केटात जाणारी एका बाजूकडील वाटच बंद करण्यात आली आहे. त्यामुळे गिऱ्हाईकांना मार्केट संकुलात खरेदीसाठी जाणे शक्य होत नाही. परिणामी संकुलातील विक्रेत्यांना सध्या ग्राहकच नाहीत. या प्रकारामुळे विक्रेत्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. ग्राहक नसले तरी सोपो कर द्यावा लागतो. मात्र दिवसभर बसूनही ग्राहक नसल्याने चिडलेल्या या विक्रेत्यांनी पालिकेवर धडक देऊन याप्रकरणी जाब विचारला व त्वरित वाट मोकळी करण्याची मागणी केली.

विक्रेत्यांचे म्हणणे ऐकून घेऊन नगराध्यक्ष गिताली तळावलीकर, नगरसेवक शांताराम कोलवेकर व मुख्याधिकारी योगीराज गोसावी यांनी मार्केट संकुलातील व्यापाऱ्यांतील घारू सावंत, नरेंद्र परब व इतरांशी चर्चा केली. यावेळी संबंधित कंत्राटदाराच्या प्रतिनिधीला बोलावण्यात आल्यानंतर त्याने येत्या शुक्रवारपर्यंत वाट खुली केली जाईल, असे सांगितल्यावर या विक्रेत्यांचे समाधान झाले. मात्र, स्लॅब घालण्याचे काम सुरू झाल्यावर किमान पंधरा ते वीस दिवस ही वाट पुन्हा बंद करण्यात येणार असल्याचे सांगितल्यावर विक्रेत्यांनी त्याला संमती दिली. पण आता ऐन बाजाराच्या दिवसात वाट मोकळी करण्याची मागणी केली.

दरम्यान, पालिकेच्या या कामाविरोधात तेथीलच एका रहिवाशाने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे हे काम थोडे रेंगाळले असल्याची माहिती पालिकेतर्फे देण्यात आली. तरीसुद्धा आता हे काम जलदगतीने पूर्ण करण्यात येईल, असे नगराध्यक्ष तळावलीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील करासवाडा येथील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

Professional League 2024: स्पोर्टिंग क्लबचा एफसी गोवाला धक्का! स्पर्धेतील सलग तिसरा विजय

Ranji Trophy 2024: गोव्याचे आजपासून मिशन सिक्कीम! मागच्या लढतीतील चुका टाळण्याचे आव्हान

BCCI T20 Tournament: गोवा महिला क्रिकेट संघाची दणदणीत कामगिरी! जम्मू-काश्मीरचा आठ विकेट राखून पराभव

Karnataka: मुरुडेश्वर मंदिरात बॉम्बस्फोट करण्याचा कट उधळला, कर्नाटकात सहा दहशतवाद्यांना अटक

SCROLL FOR NEXT