फोंडा पालिका, कुर्टीत होणार सत्तांतर!

कुर्टी पंचायतीत आज, तर फोंडा पालिकेत 8 रोजी अविश्‍वासावर चर्चा
फोंडा पालिका
फोंडा पालिकाDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: फोंडा मतदारसंघातील कुर्टी - खांडेपार पंचायत आणि फोंडा पालिकेत सत्तांतर निश्‍चित झाले असून कुर्टी - खांडेपार पंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचावरील अविश्‍वास ठरावावर बुधवारी 6 रोजी, तर फोंडा पालिकेच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांवर आणलेल्या अविश्‍वास ठरावावर येत्या शुक्रवारी 8 रोजी चर्चा होणार आहे. हे दोन्ही अविश्‍वास ठराव संमत होणार असल्याचा दावा ठराव दाखल केलेल्या संबंधित पंचायत व संबंधित पालिका नगरसेवकांनी केला आहे. दरम्यान, फोंडा पालिकेवर यावेळेला दोनवेळा नगराध्यक्षपदाची हुलकावणी दिलेल्या रितेश नाईक यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

फोंडा पालिका
बंदी असतानाही 'गोव्यात' रेती उत्खनन सुरूच

फोंडा पालिकेच्या विद्यमान नगराध्यक्ष गिताली तळावलीकर व उपनगराध्यक्ष जया सावंत यांच्याविरुद्ध आठ नगरसेवकांनी अविश्‍वास ठराव दाखल केला आहे. या अविश्‍वास ठरावावर शुक्रवारी आठ रोजी चर्चा होणार आहे, त्यानंतर नूतन नगराध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा होईल, असे ठराव दाखल केलेल्या नगरसेवकांनी सांगितले.

कुर्टी - खांडेपार पंचायतीचे विद्यमान सरपंच भिका केरकर तसेच उपसरपंच शर्मिला सांगावकर यांच्यावरही सहा पंच सदस्यांनी अविश्‍वास ठराव दाखल केला असून या ठरावावर उद्या (बुधवारी) सकाळी दहा वाजता चर्चेसाठी बैठक बोलावण्यात आली आहे. अकरा सदस्यीय या पंचायत मंडळात सहा नगरसेवकांचे बलाबल सत्ताकेंद्र ठरवते. कुर्टी - खांडेपार पंचायतीच्या या पंचायत मंडळातील कारकिर्दीतील नवव्या सरपंचाचे वेध या पंचायतीला लागले आहेत, तर फोंडा पालिकेला या पालिका मंडळातील सहाव्या नगराध्यक्षपदाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

फोंडा पालिका
Goa Updates: 'पालिकांच्या एमआरएफची तपासणी करून अहवाल द्या'

रवीमुळेच फोंड्यात कमळ फुलले!

फोंडा मतदारसंघात कधी नव्हे ते कमळ फुलले ते रवी नाईक यांच्यामुळेच अशा प्रतिक्रिया फोंडावासीयांकडून व्यक्त होत आहेत. ऐन निवडणुकीत भाजपच्या मुख्य कार्यकर्त्यांनी साथ सोडूनही आणि प्रतिकूल परिस्थितीतही रवी नाईक यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आणि फोंड्यात प्रथमच भाजपचा आमदार निवडून आला. त्यामुळे साहजिकच फोंडा पालिकेत आता भाजपचे अर्थातच रवीराज असेल हे नक्की. मागे दोनवेळा रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक यांना नगराध्यक्षपदाने हुलकावणी दिली. मात्र, यावेळेला रितेशची नगराध्यक्षपदी वर्णी लागणे शक्य असल्याचे बोलले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com