Dona Paula Jetty Dainik Gomantak
गोवा

Dona Paula Jetty: प्रवेशशुल्‍कामुळे दोनापावला जेटीवरील विक्रेते अडचणीत

दोनापावला जेटीवरील २० हून अधिक स्टॉल्‍सधारकांना जेटीबाहेर बसविण्यात आलेल्या क्युबिकल स्ट्रक्चर्समुळे ग्राहक मिळण्यास अडचणी येत आहेत.

दैनिक गोमन्तक

Dona Paula Jetty: दोनापावला जेटीवरील २० हून अधिक स्टॉल्‍सधारकांना जेटीबाहेर बसविण्यात आलेल्या क्युबिकल स्ट्रक्चर्समुळे ग्राहक मिळण्यास अडचणी येत आहेत. हे विक्रेते जेटीवर पर्यटकांकडून भरमसाठ प्रवेशशुल्क आकारण्याच्या विरोधात आहेत.

कारण त्‍यामुळे तेथे पर्यटकांची संख्‍या रोडावू लागली आहे. परिणामी त्‍यांचा व्‍यवसाय धोक्‍यात आला आहे, असे सांत-आंद्रेचे ‘आरजी’चे आमदार वीरेश बोरकर यांनी सांगितले. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून तोडगा काढावा, अशी मागणीही त्‍यांनी केली.

बोरकर यांनी आज मंगळवारी आपल्‍या कार्यकर्त्यांसह दोनापावला जेटीला भेट देऊन स्थानिक विक्रेत्‍यांच्‍या समस्‍या जाणून घेतल्‍या. यावेळी विक्रेत्‍यांनी सांगितले की, गेल्या पाच दशकांपासून अनेक स्‍थानिक लोक दोनापावला जेटीवर व्यवसाय करत आहेत. त्यांचे स्टॉल्‍स काही वर्षांपूर्वी जेटीवर होते आणि दुरुस्तीच्या कामावेळी ते जेटीबाहेर स्थलांतरित करण्यात आले होते.

अलीकडेच सरकारने स्थानिक स्टॉल्‍सधारकांना सामावून घेण्यासाठी २० पेक्षा जास्त घनसंरचना बांधल्या. परंतु हे स्टॉल्‍स खूपच लहान असल्याने विक्रेत्यांना त्याचा काहीच फायदा होत नाही. आता तर जेटीवर प्रवेशशुल्क आकारण्यात येत असल्‍यापासून पर्यटकांनी पाठ फिरविली आहे. त्‍यामुळे आमचा व्‍यवसाय थंडावला आहे, असे एका विक्रेत्या महिलेने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

Viral Video: प्रवाशांची गर्दी अन् चोरट्याचा प्लॅन तयार! दिल्ली मेट्रोमध्ये बिनधास्त चोरी; कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ चर्चेत

Saleli Car Fire: सालेलीत कार आगीत जळून भस्‍मसात; 5 लाख रुपयांचे नुकसान; गाडीनं अचानक पेट घेतल्‍यानं खळबळ

Colombia Earthquake: जमीन फाटली अन् इमारती कोसळल्या, डोळ्यांदेखत उडाली दाणादाण! कोलंबियातील भीषण भूकंपात 132 मृत्यू, 1500 हून अधिक घरे उद्ध्वस्त VIDEO

New Head Coach: वर्ल्ड कपच्या तोंडावर मोठा निर्णय; मुख्य प्रशिक्षक बदलला, आता 'या' व्यक्तीवर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT