Coastal Erosion: सावधान..! राज्यातील 9 किनाऱ्यांची मोठी धूप; लोकसभेतील माहिती

चेन्नईस्थित संस्थेच्या अभ्यासातून अनेक किनारे रुंदावल्याचे निष्पन्न
Coastal Erosion in Goa
Coastal Erosion in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Coastal Erosion in Goa: राज्यातील ९ किनाऱ्यांमध्ये मोठा बदल नोंदवण्यात आला आहे. या किनाऱ्यांची एका बाजूने धूप झाली आहे, तर दुसऱ्या बाजूने हे किनारे वाढले आहेत. चेन्नई येथील निरंतर किनारा व्यवस्थापनाचे राष्ट्रीय केंद्र या संस्थेने केलेल्या राज्यातील ४१ किनाऱ्यांच्या अभ्यासानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. लोकसभेमध्ये लेखी उत्तरांमध्ये ही माहिती आज देण्यात आली.

Coastal Erosion in Goa
Mahadayi Water Dispute: म्हादईतील पाणी साठ्यावरच न्यायालयीन लढाईची भिस्त...

राज्यातील आगोंद, हणजुणे, कांदोळी, केळशी, पाळोळे, गालजीबाग, खोला, मांद्रे आणि पोळे किनाऱ्यांची धूप एका बाजूने झाली, तर दुसऱ्या बाजूने हे किनारे वाढलेही आहेत. आश्वे, बेताळभाटी, काणगिणी, कासावली, पाटणे, केरी, सेर्नाभाटी, सिकेरी, तळपण, उतोर्डा, वागातोर आणि वेळसाव किनाऱ्यांची केवळ धूप झाली आहे.

या लेखी उत्तरात केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री आश्विनी कुमार चौबे यांनी नमूद केले आहे, की २०१९ च्या सीआरझेड अधिसूचनेनुसार किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यात किनाऱ्यांची धूप दाखवली गेली पाहिजे.

धूप दर्शवणारी धोकादायक रेषा किनारी भागात आखण्यात आल्याची माहिती त्यांनी या उत्तरातून दिली आहे. राष्ट्रीय पातळीवर विचार करता देशातील ३३.६ टक्के किनाऱ्यांची धूप होते, तर २६.९ टक्के किनाऱ्यांची वाढ होते. ३९.६ टक्के किनारे स्थिर आहेत.

दक्षिणेतील किनाऱ्यांची सर्वाधिक हानी

या उत्तरात नमूद केल्यानुसार धूप झालेले सर्वाधिक किनारे हे दक्षिण गोव्यात आहेत. यात बेताळभाटी, काणगिणी, कासावली, पाटणे, सेर्नाभाटी, तळपण, उतोर्डा आणि वेळसाव या किनाऱ्यांचा समावेश आहे. उत्तर गोव्यातील केवळ आश्वे, केरी, सिकेरी आणि बागा किनाऱ्यांची धूप झालेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com