Velsao Railway  Dainik Gomantak
गोवा

Velsao: वेळसाव रेल्वे दुपदरीकरणास स्थानिकांचा विरोध कायम

रेल्वे खाजगी जमीन बळकावत असल्याचा स्थानिकांचा आरोप

दैनिक गोमन्तक

वास्को: वेळसाव येथे रेल्वे विकास निगम लिमिटेड रेल्वे दुपदरीकरणासाठी येथील ग्रामस्थांची खाजगी जमीन बळकावण्याचा प्रयत्न वारंवार करत आहेत. असा आरोप वेळसाव ग्रामस्थांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे विकास निगम लिमिटेडचे कर्मचारी रेल्वे ट्रॅक जवळ कुंपण घालण्यासाठी आले असता यावर वेळसाव ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेत काम बंद पाडले.

(velsao citizens once again protest double railway track survey)

वेळसाव नागरिकांनी आरोप केला आहे की, रेल्वे विकास निगम लिमिटेड वेळसाव येथे रेल्वे दुपदरीकरणासाठी येथील ग्रामस्थांची खाजगी जमीन बळकावण्याचा प्रयत्न वारंवार करत आहेत. यासाठी रेल्वे पोलीस बाळाचाही वापर वारंवार करत आहे. मात्र येथील ग्रामस्थांनी रेल्वेचा डाव हाणून पाडला आहे.

Velsao Railway

व्हिलेज ॲक्शन कमिटी अगेन्स्ट डबल ट्रेकिंगचे संस्थापक सदस्य आरविलो दोरादो रॉड्रिक्स यांनी आज आरव्हिएनएलचे कर्मचारी रेल्वे ट्रॅक जवळ कुंपण घालण्याचे काम सुरू ठेवत आहेत. ही बाब निराश जनक व धक्कादायक आहे. आज पुन्हा एकदा रेल्वे कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीररित्या कुंपण घालण्याचे काम सुरू ठेवले. काही भूखंडावरील पारंपारिक मार्ग बंद करण्याचा प्रयत्न केला.

वेळसावमध्ये कोणतेही भूसंपादन झाले नसल्याचा दावा करताना आरव्हिएनएल जमीन मालकांकडून एनओसी किंवा भूसंपादन केल्याशिवाय काम कसे सुरू ठेवू शकते असा सवाल रोड्रीक्स यांनी केला. 2005 मध्ये जारी केलेल्या न्यायालयाच्या आदेशाचा ताबा त्यांच्या ताब्यात आहे.

जो पारंपारिक मार्गाशी संबंधित होता. परंतु सध्या ग्रामस्थांच्या मतांना बगल देऊन आरव्हिएनएल कर्मचारी यांच्या दुहेरी कामात व्यस्त आहेत आणि नाहक ग्रामस्थांना सतावत असल्याचे ते म्हणाले. रेल्वे खाजगी जमिनीवर आणि खाजगी जंगलात बेकायदेशीरपणे घुसखोरी करून करत असल्याचे रोड्रिक्स म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT