Velha gambling den raided, three arrested Dainik Gomantak
गोवा

वेल्हा जुगार अड्ड्यावर छापा, तिघांना अटक

जुगार अड्ड्यावर छापा, 1 लाख जप्त

दैनिक गोमन्तक

क्राईम ब्रांचने गोवा वेल्हा येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून संशयित पीटर वालीस, पांडुरंग कुंकळ्ळीकर व बेनी गोन्साल्वीस (चीचेकोडे) या तिघांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून 1 लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. क्राईम (Crime) ब्रांचला जुगार अड्ड्याबद्दल माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, गोव्यात (goa) गांजा विकणाऱ्यांचा सुळसुळाट असून क्राईम ब्रँचने बुधवारी रात्री मडगाव आणि वेर्णा या दोन ठिकाणी छापे टाकून उत्तर प्रदेशमधील दोघा संशयितांना अटक करून 8.58 लाखांचा गांजा जप्त केला.

पहिला छापा बुधवारी रात्री मडगाव स्टेशन रोडवर टाकण्यात आला. पोलिस निरीक्षक फिलोमेना कॉस्ता यांच्या नेतृत्वाखाली पाेलिसांनी राहुल मिश्रा (23) याला अटक केली. त्याची झडती घेतली असता 4.80 किलो गांजा आढळला.

त्याची किंमत 4.80 लाख रुपये होती. संशयित मडगावमधील एका लॉजमध्ये उतरला होता. स्टेशन रोडवर तो गांजा विकण्यास येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला अटक केली. उपनिरीक्षक मार्लन डिसोझा, पोलीस (police) शिपाई विक्रम खानोलकर, सैमुल्ला मकानदार आणि अजय नाईक यांचा कारवाईत समावेश होता. दुसरा छापा बुधवारी रात्री वेर्णा पंचायतीजवळ निरीक्षक फिलोमेना कॉस्ता आणि थेरान डिसोझा यांनी टाकला. यावेळी मनीष सेठ (26) या उत्तर प्रदेशमधील युवकाला अटक करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT