CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: वेळगे गावचा प्रत्येक कार्यकर्ता हा भाजपचा शिलेदार! CM सावंतांचे गौरवोद्गार; ‘विकसित भारत संकल्प’ सभा

Velge Booth Melava: भविष्यातही सर्वांना एकत्रित घेऊन पक्षकार्य व पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने झटावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वेळगे-साखळी येथे केले.

Sameer Panditrao

साखळी: ‘राष्ट्र प्रथम’ या उक्तीनुसार संपूर्ण देशात आणि गोव्यातही भाजपचे काम सुरू असून ‘विकासित भारत २०४७’ चा आमचा संकल्प आहे. पक्षाचा कार्यकर्ता हा पक्षाचा कणा आहे, तोच विकासाचा खरा शिलेदार आहे. आतापर्यंत या कार्यकर्त्यांमुळेच पक्षाने मोठी मजल मारली आहे. भविष्यातही सर्वांना एकत्रित घेऊन पक्षकार्य व पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने झटावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वेळगे-साखळी येथे केले.

वेळगे साखळी येथे ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या विकसित भारत संकल्प सभेत मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, साखळी मंडळ अध्यक्ष रामा नाईक, सरपंच सपना पार्सेकर, उपसरपंच सर्वेश मुळगावकर, सर्वेश घाडी, स्वेता गावकर, सामंता कामत, योगिता हळदणकर, जेष्ठ कार्यकर्ते शांबा गावकर, संजय नाईक, बुथ अध्यक्ष मुकेश घाटवळ, आदित्य पेडणेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

गोव्यातही भाजपचा कार्यकर्ता हा पक्षाचा शिलेदार असून वेळगेच्या विकासात महत्वाची भूमिका आमचा कार्यकर्ता बजावत आहे.

२०१२ नंतरचा वेळगे गाव पहा. या परिसरात झालेला विकास हा मी केला, असे आपण म्हणणार नाही. यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, त्यांची मेहनत आहे. आपला वेळगे गावचा प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा शिलेदार आहे. तुम्ही दिलेले प्रेम या पुढेही असेच आम्हाला मिळेल, असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

स्वागत रामा नाईक यांनी केले. गोपाळ सुर्लकर, सपना पार्सेकर यांनी आपले विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन वासू गावकर यांनी केले.

या संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘बूथ चलो अभियान’ अंतर्गत गावातील उपस्थित मतदारांशी संवाद साधला. व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. वेळगे ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रमास मतदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

नागरिकांनीही आपल्या विविध समस्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमोर कथन केल्या. त्या सर्व समस्या सोडवण्याची खात्री काही नागरिकांना दिली. आपण नेहमीच लोकांसोबत आहोत. मतदारसंघातील सर्व नागरिक हे आपलीच माणसे आहेत, तेव्हा निःसंकोच त्यांनी आपल्याकडे यावे, आपले पूर्ण सहकार्य राहिल, असेही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मतदारांना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Record: ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर नवा 'वर्ल्ड रेकॉर्ड', अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फुटबॉलपटू ठरला

Borim Accident: साकवार- बोरीत पार्क केलेल्या टेम्पोला कारची धडक

Goa Kadamba: गणेश चतुर्थीसाठी प्रवाशांची सोय; कदंब बसच्या आंतरराज्यीय फेऱ्या वाढणार

Rohit Sharma Viral Video: ट्रॅफिकमध्ये अडकूनही 'मुंबईचा राजा'नं जिंकली मनं; छोटासा हावभाव चाहत्यासाठी ठरलं मोठं 'Surprise'

Weekly Love Horoscope: प्रेमात नवा उत्साह! 'या' आठवड्यात 5 राशींना अनुभवता येईल आनंद आणि प्रेमातील बदल

SCROLL FOR NEXT