पत्रादेवी चेकनाक्यावर बिगरगोमंतकीय नागरिकांच्या लागलेल्‍या रांगा. निवृत्ती शिरोडकर
गोवा

भल्‍या पहाटे पत्रादेवी चेकनाक्यावर गोव्यातील वाहने 'त्यांना' नेण्यासाठी येतात

शेकडो बिगरगोमंतकीय युवकांना महाराष्ट्रातील वाहने पत्रादेवी चेकनाक्यावर दरदिवशी पहाटे 5 वाजल्यापासून आणून सोडतात.

Priyanka Deshmukh

मोरजी: शेकडो बिगरगोमंतकीय युवकांना महाराष्ट्रातील वाहने पत्रादेवी चेकनाक्यावर दरदिवशी पहाटे 5 वाजल्यापासून आणून सोडतात. तेथून हे युवक अबकारी नाका ते पोलिसनाक्यापर्यंत चालत येतात. पोलिसनाक्यावर त्यांची दोन मिनिटांसाठी तपासणी केली जाते. नंतर त्यांना गोव्यातील काही वाहने नेण्यासाठी येतात. हे युवक मजूर असावेत, पण ते नक्की कुठे जातात, हे मात्र कोणालाच माहीत नाही. (Vehicles from Maharashtra drop off hundreds of non-Gomantak youth at Patradevi Check Naka from 5 am)

पत्रादेवी चेकनाक्यावर बिगरगोमंतकीय नागरिकांच्या लागलेल्‍या रांगा.

उच्च न्यायालयाच्‍या आदेशानुसार, कोरोनाप्रतिबंधक दोन डोस घेतलेल्‍यांना एका राज्‍यातून दुसऱ्या राज्‍यात जाता येते. पत्रादेवी चेकनाक्‍यावर मोठ्या प्रमाणात परराज्यांतील युवक जमा होतात. महाराष्‍ट्रातील काही वाहने त्यांना नाक्यावर सोडून परत माघारी फिरतात. मग हे युवक पोलीस चेकनाक्यावर थांबतात व दोन-दोन मिनिटांनी पुढे पुढे जातात. या दोन मिनिटांत त्‍यांची कसली तपासणी होते, हा संशोधनाचा विषय ठरावा. आणि हे मजुरांचे लोंढे जातात कुठे, हे सुद्धा कळायला मार्ग नाही. ज्यांनी दोन डोस घेतलेले नाहीत, तेही थेट गोव्‍यात प्रवेश करत आहेत. केरळमधून प्रवास करणाऱ्या लोकांना गोवा राज्यात प्रवेश करण्यासाठी नकारात्मक RT-PCR अहवाल दाखवावा लागतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पाकिस्ताननं 'B' टीमला हरवलं, पण जल्लोष वर्ल्ड कप जिंकल्यासारखा! शाहबाज शरीफ यांच्या 'प्राइड'वर आकाश चोप्राचा 'मास्टर स्ट्रोक'

VIDEO: पाकिस्तानी अंपायरचा तो 'अजब' निर्णय! ऑस्ट्रेलियन खेळाडूही चक्रावले, नेटकरी म्हणाले, "अशा अडाणी लोकांना अंपायर कोणी केलं?"

Video: "हटो हटो, डोन्ट डिस्टर्ब चेट्टा"! कॅप्टन सूर्याचा धमाल व्हिडीओ; नेटवर घालतोय धुमाकूळ

Goa Police Attack: दगडफेक अन् शस्त्राने वार! मध्य प्रदेशात गोवा पोलिसांवर जीवघेणा हल्ला; सब-इन्स्पेक्टर अन् हवालदार जखमी

Kurdi: 1882 साली सोमेश्वराची घटना पोर्तुगीज दप्तरात नोंद आहे! साळावली धरणाच्या जलाशयाखाली बुडालेले 'कुर्डी' गाव

SCROLL FOR NEXT