Vegetables Price Dainik Gomantak
गोवा

Vegetables Rate : भाज्यांनी गाठली शंभरी; लिंबांना अधिक मागणी

Vegetables Rate : वाढत्या उष्म्याचा मोठा परिणाम : मानकुराद, हापूस आंबे बाजारात दाखल

गोमन्तक डिजिटल टीम

Vegetables Rate :

पणजी, राज्यात मागील महिन्याभरापासून भाज्यांच्या दरात सतत वाढ दिसून येत आहे. वाढत्या उष्म्यामुळे मांंसाहारापेक्षा शाकाहार, फळे, फळांचा रस आदींना लोक पसंती देत आहेत. उष्म्यासोबतच भाज्यांच्या दराचादेखील भडका उडाला आहे.

गावठी भाज्यांना बाजारात चांगली मागणी आहे; परंतु मागणीएवढा पुरवठा होत नसल्याने ग्राहकांना बेळगावहून येणारी भाजी विकत घ्यावी लागते.

राज्यात बहुतांशी भाज्यांनी शंभरी गाठली असून वालपापडी १२० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. वाढलेल्या महागाईमुळे तुटपुंज्या पगारात संसाराचा गाडा हाकणे मध्यमवर्गीयांना कठीण होत आहे. ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे.लागत आहे.

राज्यात मागील काही दिवसांपासून उष्मा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यापासून बचावासाठी लोक लिंबू पाणी, सरबत, फळांचा रस, शीतपेयांकडे वळले आहेत. त्यामुळे लिंबू व इतर फळांच्या दरातही वाढ झाली आहे. उत्तम दर्जाचे मध्यम आकाराचे लिंबू आठ रुपये प्रतिनग विकले जात आहे. शहाळे ४० ते ६० रुपयांना विकले जात आहे.

बाजारात मानकुराद, हापूस, तोतापुरी, सेंदुरी असे विविध प्रकारचे आंबे दाखल झाले आहेत; परंतु अजून हे आंबे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेले नाहीत. मानकुराद आंबा २,५००-३,००० रुपये, हापूस १ हजार ते ८०० रुपये, सेंदुरी २५० ते ३०० रुपये डझन दराने विकला जात आहे.

खुल्या बाजारातील भाजीचे दर (रु.मध्ये)

कांदा --- --------४०

बटाटा -----------४०

टोमॅटो -----------५०

गाजर -----------६०

फ्लॉवर ----------४०

भेंडी ------------८०

कोबी------------४०

वालपापडी --------१२०

हिरवी मिरची -------८०

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa GI Tag: गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 5 नवीन उत्पादनांना मिळाले 'GI' मानांक; कृषी समृद्धीचा जागतिक गौरव

Pillion Helmet Rule: आता मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्ती, रस्ते सुरक्षेसाठी मोठा निर्णय! टप्प्याटप्प्याने होणार अंमलबजावणी

Goa Sealed Club: सील केलेले क्लब पुन्हा सुरू झाल्याने संशय, प्रशासकीय सावळागोंधळ की मिलीभगत? 'अग्निसुरक्षे'चे नियम धाब्यावर

Goa Live News: कळंगुटमध्ये हाणामारीत वृद्धाचा मृत्यू; संशयित पोलिसांच्या ताब्यात

वर्षाचा शेवटचा दिवस आयुष्याचाही शेवटचा ठरला; गोव्याच्या समुद्रात बिहारचा एक पर्यटक बुडाला, दुसरा जखमी

SCROLL FOR NEXT