Tomato Rate Dainik Gomantak
गोवा

Goa Vegetable Rate: टॉमेटोनं सर्वसामान्यांना रडवलं, लवकरच शंभरी पार; आवक कमी झाल्याने भाजीपाला महागला

Vegetable Price Increased in Goa: राज्यात बेळगाव येथून भाजीपाल्याची आवक कमी झालेली आहे. त्यामुळे राज्यात टोमॅटोचे दर वाढलेले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात बेळगाव येथून भाजीपाल्याची आवक कमी झालेली आहे. त्यामुळे राज्यात टोमॅटोचे दर वाढलेले आहेत. पणजी बाजारात टोमॅटो ८० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात असून फलोत्पादन महामंडळाच्या गाळ्यावर ५६ रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत.

पणजी बाजारात कांदे, बटाटे प्रतिकिलो ५० रुपयांनी विकले जात आहेत. हिरवी मिरची शंभर ते १२० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेला जीवनावश्‍यक असणारा भाजीपालादेखील माफक दरात मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

महिन्याभरापूर्वी राज्यात टोमॅटोचा दर ४० रुपये किलो होता. येत्या काही दिवसांत जर आवक घटली तर टोमॅटो शंभरी गाठू शकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यात वाढलेले भाजीचे दर ऑगस्टच्या सुरवातीला आवाक्यात येतील, असे भाजी विक्रेते सांगतात.

गावठी भाजीला मागणी

राज्यातील शेतकऱ्यांद्वारे पिकविण्यात येणाऱ्या गावठी भाज्यांना तसेच रानभाज्यांना चांगली मागणी आहे. बाजारात कीर्ल दाखल झाले असून १०० ते १५० रुपये प्रतिनग दराने विकले जात आहेत. त्यासोबतच, नीरफणस, भाजीची केळी, फणस, पिकलेल्या फणसाच्या गरांचे वाटे यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT