Vegetables of Goa Dainik Gomantak
गोवा

Goa News: श्रावण महिन्‍यात भाजीपाल्याच्‍या मागणीत प्रचंड वाढ

नीरफणस, भाजीच्या केळ्यांना अधिक भाव

दैनिक गोमन्तक

Vegetable Demand Increase In Shravan: श्रावण महिन्‍यात गोव्‍यातील बहुतांश घरांमध्‍ये शाकाहारी जेवण बनविले जाते. त्‍यामुळे भाजीपाल्‍याला मोठी मागणी असते. त्‍यात नीरफणस आणि भाजीच्या केळींना तर जास्‍त पसंती दिली जाते.

मध्यम आकाराचा नीरफणस 200 रुपये प्रतिनग तर भाजीचे एक केळे 20 रुपये दराने विकले जात आहे. सोबतच आंबाडे, कंदमुळे भाज्यांची मागणीही वाढली आहे. मागील दोन महिने कडाडलेला टोमॅटोचा दर आता काही प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात आला आहे.

१४० ते १६० रुपये प्रतिकिलो दराने विकला जाणारा टोमॅटो आता ३० ते ४० रुपयांवर आला आहे. कांद्या-बटाट्यांचा भाव देखील स्थिर आहे. परंतु पालेभाज्यांच्या दरांत वाढ झालेली आहे.

बाजारात ५० रुपयांना पालेभाजीच्या दोन जुड्या विकल्या जात आहेत. जीवनावश्‍यक वस्तूंचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. पुढील उत्‍सव लक्षात घेता येत्या काळात भाजीपाल्याचे दर आणखी वधारण्याची शक्यता वर्तविण्‍यात येत आहे.

रानभाज्यांना पसंती

पणजी बाजारात तायखिळा, कुड्डूक, फांगला, कोंब, नीरफणस तसेच इतर रानभाज्या विक्रीसाठी येत आहेत. त्यांना चांगली मागणी आहे.

ग्रामीण भागात रानभाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे भाज्‍यांचे दर वाढले तरी ग्रामीण भागात फारसा परिणाम झालेला नाही. सध्‍या सर्वत्र रानभाज्या मिळत आहेत.

फलोत्पादन केंद्रातील दर

भेंडी : २५

कोबी : २१

गाजर : ३६

फ्लॉवर : २७

हिरवी मिरची : ३५

कांदा : ३१

बटाटे : ३१

टोमॅटो : २७

भाजी दर (प्रतिकिलो रु)

टोमॅटो : ४०

कांदा : ४०

बटाटा : ४०

कारली : ८०

भेंडी : ६०

कोबी : ४०

फ्लॉवर : ४०

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT