Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Panaji Junta House: ‘जुन्ता हाऊस’ अनेक कार्यालयांची, निवासस्थानांची जागा आहे. काही कार्यालये अद्यापही कार्यरत आहेत. मात्र, इमारतीच्या अवस्थेमुळे दुर्घटनेचा धोका लक्षात घेता सरकारने हा निर्णय घेतला आहे.
Panaji Junta House
Panaji Junta HouseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली ‘जुन्ता हाऊस’ ही इमारत तातडीने रिकामी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. ही इमारत धोकादायक स्थितीत असून, संरचनात्मकदृष्ट्या ती अत्यंत कमजोर बनली आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील ३० दिवसांत ही इमारत रिकामी करण्याचे निर्देश संबंधित शासकीय विभागांना देण्यात आले आहेत.

‘जुन्ता हाऊस’ ही अनेक शासकीय कार्यालयांची व निवासस्थानांची जागा आहे. काही कार्यालये अद्यापही तेथे कार्यरत आहेत. मात्र, इमारतीच्या जुनाट अवस्थेमुळे भविष्यात दुर्घटनेचा धोका लक्षात घेता सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Panaji Junta House
Junta House Panaji: 'जुन्ता हाऊस' धोकादायकच, स्ट्रक्चरल ऑडिट कशासाठी? चोडणकरांचा सवाल

ही इमारत नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन (एनबीसीसी) इंडिया लिमिटेडमार्फत पुनर्विकासासाठी निश्चित करण्यात आलेल्या शासकीय इमारतींपैकी एक आहे. पुनर्विकास प्रकल्पांतर्गत ‘जुन्ता हाऊस’सह पणजीतील इतर काही शासकीय इमारतींचे नूतनीकरण किंवा पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.

Panaji Junta House
Goa Taxi: 'आता माघार नाही'! टॅक्सी व्यावसायिकांचा आक्रमक पवित्रा; वाहतूक विभागाला घालणार घेराव

या पार्श्वभूमीवर, सुरक्षितता आणि नियोजन लक्षात घेऊन ही कार्यवाई तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशामुळे इमारतीत सध्या कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्थलांतराची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. नवीन जागांची व्यवस्था तत्काळ केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com