VEERBHADRA in Bicholim Dainik Gomantak
गोवा

Virabhadra : साखळीत हजारोंनी अनुभवला वीरभद्रचा थरार; आक्रमक नृत्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला

दैनिक गोमन्तक डिजिटल

विठ्ठलापूर साखळीतील चैत्रोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेला वीरभद्र मोठ्या उत्साहात, भक्तीभावाने साजरा करण्यात आला. टाळ व पखवाजच्या तालावर ‘भुपराज’चा गजर, हातातील धारदार तलवारी नाचवत पावली मारून नृत्य करणाऱ्या वीरभद्राचा थरार हजारो लोकांनी अनुभवला. पाच-सहा फेऱ्या मारल्यानंतर वीरभद्राचे आक्रमक रूप पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.

पुंडलीक मंदिराकडून श्रींची पालखी पूर्ववत मुख्य मंदिराजवळ आल्यानंतर वीरभद्र श्री विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ आला. देवाला नमस्कार केल्यानंतर त्याच्या दोन्ही हातांमध्ये धारदार तलवारी देण्यात आल्या.

त्यानंतर वीरभद्राचा थरार सुरू झाला. त्याने पेटत्या गवताच्या भोवती पावली मारत नृत्य सादर केले. त्यानंतर मुख्य मंडपात टाळ पखवजाच्या तालावर पावलीचा ठेका धरला. मध्येच अल्प विश्रांती घेत असताना ‘भुपराज’चा गजर सुरूच होता.

वीरभद्राला सांभाळण्यासाठी चोहोबाजूंनी खास व्यक्ती व स्वयंसेवकांचे कडे होते. पाच-सहा फेऱ्या मारल्यानंतर मध्यभागी पोहोचताच वीरभद्र आक्रमक झाला. त्याचा थयथयाट सुरू होण्यापूर्वीच त्याला पूर्णपणे जमिनीवरून वर उचलून हातातील तलवारी मोकळ्या करण्यात आल्या. मंदिरात देवाचे तीर्थ देऊन वीरभद्राचा अवतार समाप्त केला गेला.

राणेंची उपस्थिती

चैत्रोत्सवातील अखेरच्या रात्री दशावतारी नाट्यमंडळीकडून वीरभद्राचा भाग नाटकातून सादर केल्यानंतर वीरभद्र संपन्न झाला. या सोहळ्यानंतर मंदिरासमोर ठेवण्यात आलेल्या श्रींच्या रथाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी देवस्थान समितीचे पदाधिकारी माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्यासह इतर उपस्थिती होती. या रथ मिरवणुकीनंतर या उत्सवाची विधिवतपणे सांगता झाली.

परराज्यातून भाविक

या उत्सवासाठी गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटकमधून शेकडो भाविकांनी हजेरी लावली. वीरभद्रचा हा नेत्रदिपक सोहळा पाहून अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT