डिचोली: एक महिना उलटून गेला, तरी पिळगावच्या शेतकऱ्यांचे आंदोलन मिटता मिटत नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होऊन हे आंदोलन मिटणार, असे वाटत असतानाच आता ती शक्यता तूर्त अंधूक बनली आहे. 'वेदांता'ने दिलेला प्रस्ताव मान्य नसल्याने शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात निर्णायक तोडगा निघण्यात अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे अजूनही गुंता "जैसे थे" आहे.
या मागण्यासंदर्भात आणखी आठ दिवस वाट पाहू. तोपर्यंत सकारात्मक तोडगा निघाला तर ठिक. अन्यथा कायदेशीर पावले उचलण्याशिवाय पर्याय नाही, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. गेल्या २० नोव्हेंबरपासून हे शेतकरी आंदोलन करीत आहेत. गेल्या शुक्रवारी (ता. २०) शेतकऱ्यांनी डिचोलीचे उपजिल्हाधिकारी रोहन कासकर यांना पुन्हा एकदा मागण्यांचे निवेदन दिले होते.
या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर आज (गुरुवारी) शेतकऱ्यांनी पुन्हा उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. सुधाकर वायंगणकर आणि अनिल सालेलकर यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांच्या एका गटाने आज (26 डिसेंबर) सकाळी डिचोलीचे उपजिल्हाधिकारी कासकर यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या या गटाने उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर पुन्हा एकदा कैफियत मांडून मागण्यांसंदर्भात सकारात्मक तोडगा काढा, अशी विनंती केली.
या आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या
एक तर उद्ध्वस्त झालेली शेती सुपीक करून द्या, नाही तर भरीव नुकसान भरपाई द्या. कपात केलेल्या कामगारांना खाणबंदी काळातील ४८ महिन्यांच्या शिल्लक अर्धवेतनासह निवृत्ती वय गृहीत धरून थकबाकी द्यावी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.