Vat Purnima 2022 Dainik Gomantak
गोवा

सुवासिनींच्या उत्साहाला उधाण! राज्यात आज वटपौर्णिमा धार्मिक विधीनुसार साजरी

कोविडमुळे गेली दोन वर्षे वटपौर्णिमेच्या उत्सवावर विरजण पडले होते.तसेच बाजारावर निर्बंध होता.

दैनिक गोमन्तक

वास्को: पतिव्रतेचे महात्म्य वर्णन करणारे आणि सुवासिनींच्या उत्साहाला उधाण देणारे व्रत म्हणजे वटपौर्णिमा आज वास्कोत मोठ्या उत्साहात गुण्यागोविंदाने धार्मिक विधीनुसार सुवासिनींतर्फे साजरी करण्यात आली.

(Vatpoornima celebrated with great enthusiasm in the Goa today)

Vat Purnima 2022

आज वटपौर्णिमा साजरी होत असल्याने सर्वत्र सूवासिनींमध्ये उत्साह संचारला होता. कोविडमुळे गेली दोन वर्षे वटपौर्णिमेच्या उत्सवावर विरजण पडले होते.तसेच बाजारावर निर्बंध होता. यंदा हे निर्बंध शिथिल झाल्याने काल वटपौर्णिमेच्या साहित्याने बाजार फुलून गेला होता. आज वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी महीलांनी काल बाजारात गर्दी केली होती. आंबे, फणस, केळी व इतर फळे, वडाच्या फांद्या, वडाची पाने,अणशीचे दोर आदी साहित्याची मोठ्या प्रमाणात विक्री झालेली पाहावयास मिळाली. वटपौर्णिमेच्या साहित्याला चांगली मागणी होती. त्यानुसार व्यापारी वर्गाचा व्यापार बरा झाला.

दरम्यान आज सुवासिनींतर्फे वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली प्रत्येक मंदिरात सकाळपासून महिलांची गर्दी होती. मंदिराकडे असलेल्या वडाला सूत गुंडाळून व इतर धार्मिक विधी करून सुवासिनींनी वडाची पूजा केली व जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे अशी प्रार्थना करून व्रत केले व उपवास पाळला. पुरोहितांच्या मंत्रोच्चाराने सदर धार्मिक विधी पार पडली. नव वर वधूंचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. वडाची पूजा अर्च्या झाल्यानंतर सुवासिनींतफेॆ एकमेकांना हळदी कुंकू करून प्रसाद म्हणून फळांवरांनी भरलेला द्रोड वाण म्हणून देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT