Vasco Dainik Gomantak
गोवा

Vasco: वास्को येथे कारवर कोसळले झाड; चालक सुदैवाने बचावला, दाबोळीत भूस्खलनामुळे 2 घरांना धोका

Vasco Tree Fall Incident: सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वास्को परिसरात गुरुवारी मोठी दुर्घटना टळली. मुरगाव बंदराकडे जाणाऱ्या एका कारवर भलेमोठे झाड उन्मळून पडल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

वास्को: सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वास्को परिसरात गुरुवारी मोठी दुर्घटना टळली. मुरगाव बंदराकडे जाणाऱ्या एका कारवर भलेमोठे झाड उन्मळून पडल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले. मात्र, कारमध्ये बसलेला चालक सुदैवाने थोडक्यात बचावला. घटनेनंतर वास्को अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत झाड हटविण्याचे काम केले.

मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील एक व्यक्ती बंदरात प्रवेशासाठी आवश्यक असलेला पास आणण्यासाठी गेली होती, तर चालक कारमध्येच थांबला होता. त्याचवेळी अचानक झाड कोसळून कारच्या छतावर पडले. प्रसंगावधान राखत चालक खाली वाकल्याने त्याचा जीव वाचला. झाडाचा आकार मोठा असल्याने ते हटविण्यासाठी क्रेनची आवश्यकता भासली.

दरम्यान, नानकनगर-दाबोळी येथे भूस्खलनानंतर मोठे दगड उघडे पडल्याने दोन घरांना धोका निर्माण झाला आहे. माजी नगरसेवक सुदेश भोसले यांनी तलाठी गौतम साळुंके यांच्यासह घटनास्थळी पाहणी केली. तलाठ्यांनी याबाबतचा अहवाल मुरगाव मामलेदार कार्यालयाकडे सादर केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ravindra Jadeja ODI Career: रवींद्र जडेजाची वनडे कारकीर्द संपुष्टात? न्यूझीलंड मालिकेपूर्वी चेतेश्वर पुजाराच्या वक्तव्यानं क्रिकेट वर्तुळात खळबळ

Diwali Magazine Tradition: गोव्याच्या साहित्यविश्वाचा दिवाळी फराळ! जाणून घ्या दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा

Parliament Fight Video: संसद बनली कुस्तीचा आखाडा! सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान हाणामारी; लाथा-बुक्क्या अन् पाण्याच्या बाटल्यांनी हल्ला

Police Assault: कपडे फाडले, लाथाबुक्क्यांनी तुडवले, टोळक्याने केला हल्ला; ऑन-ड्यूटी पोलिसाला किन्नरांकडून बेदम मारहाण

IND vs NZ 5th T20: पाचव्या टी-20 साठी कर्णधाराची नवी चाल; 5 स्टार खेळाडू संघातून बाहेर, 'अशी' असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

SCROLL FOR NEXT