Vasco Traffic CCTV Cameras Dainik Gomantak
गोवा

Vasco Traffic News: वास्कोत बसवलेले 62 सीसीटीव्ही कॅमेरे निकामी; वाहतूक पोलिसांच्या तपासात अडथळे

वाहतुकीच्या देखरेखीवर परिणाम

Kavya Powar

Vasco Traffic News: वास्को शहरात बसवलेले सुमारे 62 सीसीटीव्ही कॅमेरे निकामी झाले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या तपासात अडथळे येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हे कॅमेरे वास्कोतील प्रमुख चौकांमध्ये बसवले आहेत; परंतु त्यांच्या स्थितीमुळे वाहतुकीच्या देखरेखीवर परिणाम झाला आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे स्थानिक क्षेत्र विकास योजनेंतर्गत निश्चित बसवण्यात आले होते. मात्र आता हे सीसीटीव्ही बंद असण्याबाबत स्थानिकांनी सांगितले. वर्दळीचे ठिकाण असलेल्या वास्को शहरात 24X7 कार्यात्मक सीसीटीव्ही असणे आवश्यक आहे असे, मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

काही दिवसांपूर्वी एका 79 वर्षीय इसमाचा अपघात घडला होता. जर वाहतुकीवर पाळत ठेवणारी यंत्रणा कार्यान्वित असती, तर त्या इसमाला धडक देणाऱ्या कार ड्रायव्हरला पोलिस अटक करू शकले असते, असे एका स्थानिकाने सांगितले.

मुरगाव नगरपरिषदेने (MMC) हे सीसीटीव्ही कॅमेरे ताबडतोब दुरुस्त केले पाहिजेत, असे वास्को वाहतूक सेलचे प्रभारी शैलेश नार्वेकर यांनी सांगितले. याबाबत MMC चेअरपर्सन गिरीश बोरकर म्हणाले की, त्यांनी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांच्याकडेही याबाबत चर्चा केली आहे आणि लवकरच पोलिस आणि वाहतूक सेलची याबाबत बैठक घेतली जाणार असून शहरातील ही समस्या तातडीने सोडवण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Career and Money Horoscope: करिअरमध्ये यश, पैशांत वाढ! वाचा दैनिक भविष्य; जाणून घ्या ग्रहांचे संकेत

Cutbona Jetty: 'माशे मेंळ्ळे ना'! समुद्र अजून खवळलेला, कुटबण जेटीवर मजूर परतले; ट्रॉलरमालकांची वाढली लगबग

Goa Assembly Live: जपान आणि अमेरिकेच्या काही भागात स्थलांतराचा इशारा

Illegal Liquor Goa: सासष्‍टीत सर्वाधिक बेकायदा दारू धंदा! 5 वर्षांत 1395 प्रकरणे नोंद; नव्‍याने 2365 परवाने

Goa Crime: धमकी, खून - अत्याचाराचा प्रयत्न! आरोपीला 10 वर्षांचा कारावास; फास्ट ट्रॅक न्यायालयाचा निवाडा

SCROLL FOR NEXT