Vasco to Chennai weekly train service Dainik Gomantak
गोवा

Vasco to Chennai Train: वास्को ते चेन्नई साप्ताहिक रेल्वेसेवा सुरू करा! रेल्वे सल्लागार समितीची हुबळी येथे बैठक

Vasco to Chennai weekly train service: भंडारी यांनी या बैठकीत सावर्डे-कुडचडे रेल्वे स्थानकावर सुरक्षा दलाची चौकी सुरू करावी, अशी मागणी केल्यावर सुरक्षा दल तैनात केले जाईल.

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco Chennai Train Service : वास्को ते चेन्नई ही साप्ताहिक रेल्वेसेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी दक्षिण-पश्चिम विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या हुबळी येथे झालेल्या बैठकीत समितीचे सदस्य देवानंद नाईक भंडारी यांनी केली.

यावेळी ही गाडी सध्या हुबळीपर्यंतच धावत असून लोहमार्गाचे दुपदरीकरण पूर्ण झाल्यावर ही सेवा पूर्ववत सुरू केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले.

भंडारी यांनी या बैठकीत सावर्डे-कुडचडे रेल्वे स्थानकावर सुरक्षा दलाची चौकी सुरू करावी, अशी मागणी केल्यावर सुरक्षा दल तैनात केले जाईल आणि अधिक सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल, असे बैठकीत ठरवण्यात आले.

सावर्डे-कुडचडे रेल्वे स्थानकाचे काम जुलैपर्यंत पूर्ण केले जाणार असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.

समितीची २५वी बैठक मंगळवारी (ता.२४) हुबळी येथील चालुक्य इन्स्टिट्यूटमध्ये पार पडली. बैठकीचे अध्यक्षस्थान अतिरिक्त महाव्यवस्थापक पी. अनंत यांनी भूषविले. प्रवासी सुविधा, रेल्वे गाड्यांच्या सेवा आणि पायाभूत सुविधा विकासासंदर्भातील विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा केली.

दक्षिण पश्चिम रेल्वेचे एप्रिल ते डिसेंबर २०२५ दरम्यान एकूण उत्पन्न ६ हजार ६९४.०५ कोटी रुपये इतके झाले असून मागील वर्षाच्या तुलनेत ११.४४ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. प्रवासी उत्पन्न २ हजार १९६.०९ कोटी रुपये, मालवाहतूक उत्पन्न विक्रमी ४ हजार ०३९ कोटी रुपये, इतर उत्पन्न १६७ कोटी रुपये आणि पार्सल उत्पन्न विक्रमी १२९ कोटी रुपये इतके झाले आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

असोल्डा उड्डाणपुलाबाबत विशेष चर्चा

कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी असोल्डा येथील उड्डाणपुलाचा विषय मांडला तेव्हा यासाठी ३३ हजार ३७९ चौरस मीटर जमिनीची गरज होती व फक्त २८ हजार ८६६ चौरस मीटर जमीन उपलब्ध होत होती. याशिवाय उड्डाणपुलाची जागा बदलण्याची मागणी पुढे आली.

सुचवलेली नवी जागा उड्डाणपूल बांधण्यासाठी योग्य नसल्याचे दिसून आले. असोल्डा येथे दुचाकींसाठी लोहमार्गाच्या खाली भुयारी मार्ग बांधण्यासाठी शक्याशक्यतेचा अभ्यास करण्यात येत असल्याची माहितीही यावेळी बैठकीत देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT