Chhatrapati Shivaji Maharaj statue Vasco Dainik Gomantak
गोवा

Vasco: छत्रपतींच्या पुतळ्यावरून तणाव, सडा चौकात अनावरण करण्याचा शिवप्रेमींचा निर्धार

Chhatrapati Shivaji Maharaj statue Vasco: सडा चौकातील ज्या मोकळ्या जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला आहे, त्या जागेवर मुरगाव बंदर प्राधिकरणाने आपला हक्क सांगितल्याने तेथे तणाव निर्माण झाला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को: सडा चौकातील ज्या मोकळ्या जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला आहे, त्या जागेवर मुरगाव बंदर प्राधिकरणाने आपला हक्क सांगितल्याने तेथे तणाव निर्माण झाला आहे. मुरगाव बंदर प्राधिकरणाची दादागिरी आम्ही सहन करणार नाही, ता. १९ रोजी शिवजयंतीनिमित्त पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार असल्याचे काही शिवप्रेमींनी सांगितले आहे. त्यामुळे तेथे तणाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

मुरगावातील शिवप्रेमींनी एकत्र येत सडा चौकातील विनावापर असलेल्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज याचा पुतळा उभारण्याचे ठरविले होते. त्यानुसार ती जागा स्वच्छ करण्यात आली. ता. १९ रोजी शिवजयंती असल्याने ता. १८ रोजी तेथे पुतळा आणला गेला. 

सदर पुतळ्याचे ता. १९ रोजी अनावरण करण्यात येणार आहे. मात्र तत्पूर्वी त्या जागेवर मुरगाव बंदर प्राधिकरणाने आपला हक्क सांगून तेथे पुतळा उभारण्यास आडकाठी आणली आहे. सदर माहिती मिळताच तेथे काही शिवप्रेमी जमले. त्यांनी प्राधिकरण प्रत्येक जागेवर आपला अधिकार गाजवीत असल्याचा आरोप केला. कवी उध्दव पोळ यांनी लोकांनी प्राधिकरणाच्या दादागिरीचा निषेध व्यक्त करण्यासाठी ता. १९ रोजी मोठ्या संख्येने जमावेत, असे आवाहन केले.

विरोध करू नये!

रवींद्र भवनाचे अध्यक्ष जयंत जाधव यांनी पुतळ्याचे कोणत्याही परिस्थितीत अनावरण होणारच असल्याचे सांगितले. आम्ही शांतीप्रिय आहोत, आम्हाला प्राधिकरणाने विरोध करू नये, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी डॉ. धर्मेंद्र प्रभूदेसाई, उर्मिला शिंदे, निधी शेटगावकर, दिव्या वेंगुर्लेकर, यांनीही विचार मांडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT