Vasco RTO Dainik Gomantak
गोवा

Vasco RTO: वास्को आरटीओने व्हीआयपी नोंदणी क्रमांकांमधून केली तब्बल 60 लाखांची कमाई

2022 मध्ये एकूण 5399 नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

2022 मध्ये वास्को परिवहन विभागाकडे दुचाकी, चारचाकी वाहनांसह एकूण 5399 वाहनांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी 160 दुचाकी व चारचाकी वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांसाठी फॅन्सी क्रमांक घेतले असून वास्को आरटीओला यामधून तब्बल 66 लाख 59 हजार 59 हजार रुपयांची कमाई झाल्याची माहिती वाहतूक विभागाचे अतिरिक्त संचालक राजेश नाईक यांनी दिलीय.

यासंदर्भात नाईक म्हणाले "गोव्यातील काही लोक त्यांच्याकडील जुन्या गाडीचा नंबर लकी नंबर मानतात आणि तोच नंबर घेतात. काहीजण स्वतःच्या, आई-वडिलांच्या, मुलांच्या वाढदिवसाची तारीख, लग्नाची तारीख निवडतात.

तर काहीजण 1111, 7777, 1234 अशा सीरिजचे व्हीआयपी नंबर घेतात. 2021 मध्ये वास्कोमध्ये 108 लोकांनी नवीन वाहन नोंदणी करतेवेळी त्यांच्या आवडीचा क्रमांक घेतला. त्यासाठी एकूण 33,24,000 रुपये शुल्क आकारण्यात आले होते.

लोकांना त्यांच्या पसंतीचा क्रमांक निवडण्यासाठी 35,000 रुपये शुल्क भरावे लागते. 2022 मध्ये एकूण 5399 नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये 3437 दुचाकी, 1518 चारचाकी, 218 टॅक्सी आणि 226 इतर वाहनांचा समावेश असल्याची माहिती नाईक यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT