Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: वास्को रेल्वे स्थानकावरून अल्पवयीन मुलीचे अपहरण, अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल

Goa kidnapping case: वास्को रेल्वे स्थानकावरून गुरूवारी (४ डिसेंबर) संध्याकाळी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Sameer Amunekar

वास्को: वास्को रेल्वे स्थानकावरून गुरूवारी (४ डिसेंबर) संध्याकाळी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका महिलेने आपल्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली असून, या प्रकरणी वास्को रेल्वे पोलिसांनी तत्काळ एफआयआर नोंदवला आहे.

घटना गंभीर असल्याने पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. स्थानक परिसरातील सर्व मार्ग, प्लॅटफॉर्म आणि बाहेर जाणाऱ्या रस्त्यांवरील हालचालींची तपासणी करण्यात येत आहे. मुलीला एका अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा आरोप मुलीच्या आईनं केला आहे.

अज्ञात आरोपी आणि अपहरण झालेल्या मुलीचा माग काढण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम राबवली आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज मागील काही तासांतील हालचालींसाठी तपासले जात आहे. स्थानक परिसरात उपस्थित असलेल्या प्रवाशांकडून, स्थानिक विक्रेत्यांकडून तसेच ऑटोचालकांकडूनही माहिती घेतली जात आहे.

दरम्यान, मुलगी सुरक्षित मिळावी यासाठी पोलिसांनी जनतेलाही पुढे येऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याची विनंती करण्यात आली आहे.

पुढील तपासासाठी हे प्रकरण पीएसआय कृष्णा जी. तल्पी यांच्याकडे सोपवण्यात आले असून, ते विविध तांत्रिक आणि स्थानिक पुराव्यांच्या आधारे अपहरणाचा धागा पकडण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT