Vasco police Dainik Gomantak
गोवा

Vasco : किनारी भागातील छम छम थांबेना; वास्को पोलिसांनी हॉटेल, रेस्टॉरंट मालकांसोबत घेतली महत्त्वाची बैठक

रात्री 10 नंतर संगीत पार्टी आयोजित केल्यास कारवाई निश्चित

दैनिक गोमन्तक डिजिटल

वास्को : गोवा राज्यातील किनारी भागात रात्री 10 नंतर कोणत्याही प्रकारची संगीत पार्टी आयोजित करण्यावर उच्च न्यायालयाने निर्बंध घातले आहेत. मात्र राज्यातील काही किनाऱ्यावर हे प्रकार सुरु असल्याने आज वास्को पोलिसांनी स्थानिक हॉटेल, रेस्टॉरंटचे मालक व व्यवस्थापक यांच्यासोबत आज बैठक घेत संगीत पार्टी बंदसाठी आवाहन केले. यावेळी उपस्थितांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

( Vasco police held a meeting to prevent night music parties from being organized in coastal areas of Goa state )

कर्णकर्कश ध्वनीप्रदूषणसंबंधी घटनांची गंभीर दखल घेत न्यायालयाने ध्वनिप्रदूषण रोखण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. यावरुन घेतलेल्या बैठकीदरम्यान पोलिसांनी संबंधितांना योग्य माहिती दिली.

यावेळी काही घरमालकांनी आपल्या भाडेकरूसंबंधी पोलिसांकडे पडताळणी अर्ज दाखल केले नव्हते, अशा सात घरमालकांविरोधात मुरगाव उपजिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली.

या बैठकीदरम्यान पोलिस म्हणाले की, घरमालक आपल्या खोल्या भाड्याने देतात. परंतु, भाडेकरूंची माहिती पोलिसांना देण्यासंबंधी गंभीर नसतात. त्यांना वारंवार आवाहन करूनही ते सतत दुर्लक्ष करीत असतात. त्यामुळे एखाद्या गुन्हेगार भाडेकरूसंबंधी माहिती मिळण्यास अडचण होते.

जर घरमालकांनी भाडेकरूची माहिती दिल्यास त्यासंबंधी त्या भाडेकरूची माहिती त्याच्या मूळच्या राज्यातून मागविणे सोपे जाते. परंतु, दुर्दैवाने तसे होत नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच यापुढे अशा मालकांवर कारवाई होणार असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT