Vasco police bust IPL Betting racket, arrest 6 persons  Dainik Gomantak
गोवा

IPLसट्टेबाजी रॅकेटचा वास्को पोलिसांनी केला पर्दाफाश

वास्कोतील एक व्यक्ती या टोळीशी जोडलेला आहे त्यालाही लवकरच अटक केली जाईल.

Priyanka Deshmukh

वास्को पोलिसांनी (Vasco) आयपीएल सट्टेबाजी रॅकेटचा (IPL Betting racket) पर्दाफाश केला, गुरुवारी मध्यरात्री न्यू वडेम (New Vaddem) येथे टाकलेल्या छाप्यात 6 जणांना अटक करण्यात आली आहे.विशिष्ट आणि विश्वासार्ह माहितीच्या आधारे वास्को पोलिसांनी न्यू वडेम येथील Sushila Sea winds नावाच्या एका फ्लॅटवर छापा टाकला.

गुरुवारी मध्यरात्री आयपीएल क्रिकेट सामन्यांच्या बेकायदेशीर सट्टेबाजीत सहभागी असलेल्या आंतरराज्यीय सट्टेबाज रॅकेटचा पर्दाफाश केला. सट्टेबाजीत सामील असलेल्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी 5 जण नागपूरचे आणि एक राजस्थानमधील होता. या धडक कारवाईत 2 लॅपटॉप, मोबाईल फोन, फोन कॉल प्राप्त करण्यासाठी मोबाईल फोनशी जोडलेले दोन सुधारित उपकरण, एक TV आणि काही लेखी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

छापेमारी दरम्यान वास्को पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, ही टोळी 19 सप्टेंबरपासून या परिसरा कार्यरत होते आणि यांच्याकडून पैसांचे किंवा वस्तूंचे आधान प्रदान केले जात होते. वास्कोतील एक व्यक्ती या टोळीशी जोडलेला आहे त्यालाही लवकरच अटक केली जाईल. अटक झालेल्या सर्व सहा आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती वास्को पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT