Vasco police arrest 13 in assault case Dainik Gomantak
गोवा

मारहाण प्रकरणी वास्को पोलिसांकडून 13 जणांना अटक

कायदा व सुव्यवस्थेसाठी भारतीय राखीव दलाच्या 2 तुकड्या वास्को परिसरात तैनात

दैनिक गोमन्तक

रामनवमीच्या शोभायात्रेवर दगडफेक केल्यानंतर झालेल्या तणावाची स्थिती सक्षमरीत्या हाताळण्यास अपयश आल्याबद्दल मुरगावचे उपअधीक्षक सलीम शेख आणि वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक नितीन हलर्णकर यांची तडकाफडकी गोवा (goa) राखीव पोलीस दलात बदली करण्यात आली आहे.

दरम्यान, वास्कोतील रामनवमी रथयात्रेदरम्यान झालेली दगडफेक, मारहाण प्रकरणी वास्को पोलिसांकडून 13 जणांना अटक (arrested) करण्यात आली आहे. पुढील चौकशी वास्को पोलिस करत आहेत. कायदा व सुव्यवस्थेसाठी भारतीय राखीव दलाच्या 2 तुकड्या वास्को परिसरात तैनात करण्यात आल्या आहेत. परिसरात तणावाचे वातावरण पहायला मिळत आहे.

पोलीस मुख्यालय अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी काल जारी केलेल्या आदेशात त्यांच्या जागेवर उपअधीक्षक निलेश राणे आणि निरीक्षक कपिल नायक याना रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.

वास्कोतील (Vasco) रविवारच्या रथयात्रेवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर वास्कोचे पोलीस (police) उपअधीक्षक सलीम शेख व निरीक्षक नितीन हळर्णकर या दोघांना तत्काळ राखीव दलात हजेरी लावण्याचा बिनतारी संदेश देण्यात आला होता. त्यांच्याजागी उपअधीक्षक नीलेश राणे आणि निरीक्षक कपिल नायक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT