Vasco New Fish Market Dainik Gomantak
गोवा

Vasco New Fish Market: वास्कोतील मासळी मार्केट प्रकल्पावर पुन्हा प्रश्नचिन्ह, नियोजनाचा अभाव; नागरिकांमध्ये नाराजी

Mormugao Municipal Council Market Management: वास्को येथील दोन मजली मासळी मार्केट प्रकल्प आता मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

वास्को: वास्को येथील दोन मजली मासळी मार्केट प्रकल्प आता मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेला हा प्रकल्प वास्कोवासीयांच्या दीर्घकालीन अपेक्षांचे प्रतीक मानला जात होता. मात्र, प्रत्यक्षात या प्रकल्पाची अंमलबजावणी आणि व्यवस्थापनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

नवीन रचनेनुसार तळमजल्यावर मासळी विक्रेते, पहिल्या मजल्यावर फळ, भाजी आणि नारळ विक्रेते, तर भुयारी भागात पार्किंगची सोय करण्यात आली होती. परंतु पहिल्या मजल्यावर ग्राहकच न येत असल्याने फळ-भाजी विक्रेत्यांचा व्यवसाय ठप्प झाला. त्यामुळे त्यांनी पुन्हा तळमजल्यावरील पदपथावर आपला व्यवसाय सुरू केला आहे, जिथे पूर्वीप्रमाणेच मोठ्या छत्र्या आणि तात्पुरती मांडणी दिसत आहे. पालिकेने काही काळ अतिक्रमण रोखण्यासाठी कर्मचारी नेमले, तसेच पार्किंग जागेचा पर्यायही दिला. मात्र, विक्रेत्यांनी तो स्वीकारला नाही. परिणामी नियोजन कोलमडले आणि प्रकल्पाचा मूळ उद्देशच धुसर झाला आहे.

कोट्यवधींचा खर्च वाया

या स्थितीबाबत नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींच्या मते नव्या प्रकल्पामुळे सुविधा वाढल्या आहेत, तर अनेकजण म्हणतात की पूर्वीचे साधे पण व्यवस्थित मासळी मार्केट अधिक कार्यक्षम होते. सध्या हा प्रकल्प ‘सुंदर योजना; पण अपयशी अंमलबजावणी’चे उदाहरण ठरत असल्याची चर्चा सुरू आहे. एकूणच, कोट्यवधींचा खर्च करून उभारलेला हा प्रकल्प नियोजनाअभावी पुन्हा जुन्या स्वरूपाकडे परतल्याचे चित्र दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT