Mormugao  Dainik Gomantak
गोवा

Vasco: कचरावाहू ट्रक मुरगाव पालिकेच्या ताफ्यात, नगराध्यक्षांच्या हस्ते लोकार्पण

Mormugao municipal equipment: मुरगाव पालिकेच्या निधीतून खरेदी केलेल्या कचरावाहू ट्रक, गवत कापणारी पाच यंत्रे, डासांना पिटाळून लावण्यासाठी धूर सोडणारी पाच यंत्रे, झाड कापणारे यंत्र यांचा शुभारंभ नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांच्या हस्ते करण्यात आला.

Sameer Amunekar

वास्को: मुरगाव पालिकेच्या निधीतून खरेदी केलेल्या कचरावाहू ट्रक, गवत कापणारी पाच यंत्रे, डासांना पिटाळून लावण्यासाठी धूर सोडणारी पाच यंत्रे, झाड कापणारे यंत्र यांचा शुभारंभ नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांच्या हस्ते करण्यात आला.

येणाऱ्या काळात कचरापेट्यांचा उपयोग टाळण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले. मुख्याधिकारी सिध्दिविनायक नाईक यांनी प्लास्टिकपासून इंधन तयार करण्यासंबंधीचा प्रस्ताव गोवा एनर्जी डेव्हलॉपमेंट एजन्सीने मांडला असल्याचे सांगितले. त्याची कार्यवाही झाल्यास प्लास्टिकसंबंधीची समस्या दूर होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

सुमारे ७० लाख खर्च करून मुरगाव पालिकेने सदर वाहन व यंत्रे खरेदी केली आहेत. शुभारंभप्रसंगी नगराध्यक्ष बोरकर यांच्यासह नगरसेवक नारायण बोरकर,दामोदर कासकर, प्रजय मयेकर, यतीन कामुर्लेकर, मुख्याधिकारी सिध्दीविनायक नाईक, तसेच अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

खरेदी करण्यात आलेल्या ट्रकाचा उपयोग साळीगाव येथे सुका कचरा नेण्यासाठी करण्यात येणार आहे. येणाऱ्या काळात गोवा शिपयार्डच्या सहकार्याने काही वाहने खरेदी केली जातील. पालिका क्षेत्रात दारोदारी कचरा संकलनासाठी रिक्षा वापरता येईल. कचरा पेट्यांचा वापर बंद होण्यास मदत होईल. कचरापेट्यांमुळे त्यातील अन्नपदार्थ खाण्यास भटकी गुरे येतात.त्यामुळे कचरा पसरतो, असे बोरकर म्हणाले.

लवकरच दोन कॉम्पॅक्टर मिळणार

येत्या काळात आणखी दोन कॉम्पॅक्टर ट्रक मुरगाव पालिकेसाठी उपलब्ध होतील. झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी हायड्रोलीक ट्रक तसेच टॅँकरही ताफ्यात येणार आहेत. थकबाकी चांगल्या रितीने वसूल होत आहे.त्यामुळे पालिकेचे आर्थिक स्थिती मजबूत होत असल्याचे नगरसेवक यतीन कामुर्लेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mahavatar Narasimha: ‘महावतार नरसिंह’ची गर्जना! एका दिवसात कमावले 'इतके' कोटी; विक्रमी कलेक्शनकडे वाटचाल

Viral Video: हे काय चाललंय! महिलेचा 'हा' व्हिडिओ पाहून तुम्हीही माराल डोक्यावर हात; नेटकरी व्यक्त करतायेत संताप

Accident in Goa: कुंडई औद्योगिक वसाहतीत अपघात; छत दुरुस्ती करताना कामगाराचा मृत्यू!

Goa Crime: प्रेमाचा त्रिकोण! सांगोल्डात युवकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण; प्रियकरासोबत-प्रेयसी फरार

Goa Live Updates: चेन्नई-तामिळनाडू येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विभागीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोवा महिला संघ उपविजेता

SCROLL FOR NEXT