Vasco Modern Market Shopkeepers Dainik Gomantak
गोवा

Vasco News: 'बेकायदा' विक्रेत्यांविरुद्ध वास्कोत दुकान बंद आंदोलन! त्वरित कारवाईची दुकानदारांची मागणी

Vasco Modern Market: मॉडर्न मार्केटमधील दुकानदारांनी आज सकाळी आपली दुकाने बंद ठेवून पदपथावर बेकायदा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: येथील मॉडर्न मार्केटमधील दुकानदारांनी आज सकाळी आपली दुकाने बंद ठेवून पदपथावर बेकायदा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. पालिकेने दुकानदारांना त्या बेकायदा विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर माॅर्डन मार्केटमधील दुकानदारांनी आपली बंद ठेवलेली दुकाने सुरू केली.

पदपथावरील विक्रेत्यांवर मुरगाव पालिका अंकुश आणत नसल्याने वास्कोतील मॉर्डन मार्केटमधील दुकानदारांनी आज सकाळी आपली दुकाने बंद ठेवून निषेध केला होता.

वास्कोत बिगर गोमंतकीय कपडे विक्रेते, चप्पल विक्रेते तसेच इतर सामानांची विक्री मोक्याच्या ठिकाणी दुकाने थाटून करत आहेत. लोकांना पाहिजे असलेले सामान रस्त्यावर मिळत असल्याने लोक गाडीतच बसून या विक्रेत्यांकडून सामान घेऊन जातात.

त्यामुळे मार्केटमधील दुकानांत ग्राहक येत नसल्याने दुकानदारांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. पालिकेला सर्वप्रकारचे शुल्क भरून आम्हाला न्याय मिळत नाही. पालिका बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्या विकेत्यांवर कारवाई करत नसल्याने पालिकेचे शुल्क भरून काहीच फायदा नाही, असे या दुकानदारांचे म्हणणे होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

Goa Agriculture: गोव्यात झेंडू शेतीला बहर! 150 हेक्टरवर लागवड, 200 टन उत्पादनाचा अंदाज

SCROLL FOR NEXT