Vasco market dainik gomantak
गोवा

Vasco: मुरगाव पालिकेने दीड तासात केले 26 हजार रुपये वसूल; वास्कोत कचरा शुल्कासाठी धडक मोहीम

Vasco Market Vendors: अवघ्या दीड तासात मुरगाव पालिकेने २६ हजार रुपये विक्रेत्यांकडून वसूल केले. विक्रेत्यांनीही आढेवेढे न घेता ही रक्कम दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco Market Vendors Mormugao Municipality Waste Fee

वास्को: भाजी मार्केटातील विक्रेत्यांकडून कचरा शुल्क गोळा करण्याची मोहीम मुरगाव पालिकेने सोमवारपासून सुरू केली. अवघ्या दीड तासात मुरगाव पालिकेने २६ हजार रुपये विक्रेत्यांकडून वसूल केले. विक्रेत्यांनीही आढेवेढे न घेता ही रक्कम दिली. पुढील दोन दिवस ख्रिसमसचे असल्याने ही मोहीम पुन्हा २६ रोजीपासून सुरू होणार असल्याची माहिती मिळाली.

येथील भाजी मार्केटातील सर्व प्रकारचा कचरा मुरगाव पालिका उचलते. आतापर्यंत तेथील विक्रेत्यांकडून कचरा शुल्क घेण्यासाठी पालिका गंभीर दिसत नव्हती, याचा गैरफायदा घेत विक्रेते कचरा शुल्क देण्याचे टाळत होते. या मार्केटातील भाजी, फळे विक्रेत्यांचा ओला व कुजलेला कचरा पालिका गोळा करते. परंतु आजवर येथील विक्रेत्यांकडून कचरा शुल्क गोळा करण्यास मुरगाव पालिकेने उत्सुकता दाखविली नव्हती. त्यामुळे पालिकेला महिन्याकाठी सुमारे ९० हजार रुपयांच्या महसुलाला मुकावे लागत होते. आता मुरगाव पालिकेने कचरा शुल्क गोळा करण्यास आरंभ केला आहे.

विक्रेत्यांचे सहकार्य

सोमवारी दुपारी १२ वाजता कचरा शुल्क गोळा करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. मार्केटातील विक्रेत्यांकडून दुपारी दीड वाजेपर्यंत २६ हजार रुपये कचरा शुल्कापायी गोळा झाले. नगराध्यक्ष गिरीश बोरकर, मुख्याधिकारी दिपेश प्रियोळकर, नगरसेवक नारायण बोरकर, नगरसेवक दामू नाईक, नगरसेवक दामू कासकर, पालिका निरीक्षक योगेश, पालिका अधिकारी संध्या यांनी मार्केटात फिरून विक्रेत्यांना कचरा शुल्कासंबंधी माहिती दिली. विक्रेत्यांनीही चांगले सहकार्य केले.

कचरा रस्त्यावर

विक्रेत्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने पालिकेच्या कचरावाहू वाहने मार्केटात जाऊ शकत नाही. त्यामुळे विक्रेत्यांनी कचरा वर्दळीच्या हमरस्त्यावर टाकण्यास आरंभ केला आहे. हा कचरा पालिका उचलते. मात्र या कचऱ्यामुळे वाहनचालकांना, पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यासंबंधी मुरगाव पालिकेने तोडगा काढण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT