Mauvin Godinho Dainik Gomantak
गोवा

'वास्को कदंब बसस्थानक प्रकल्प मार्गी लावणार'

माविन गुदिन्हो यांचं आश्वासन; मासळी मार्केट प्रकल्प मार्गी लावण्यासाठी करणार सहकार्य

दैनिक गोमन्तक

वास्को : येणाऱ्या काळात नियोजित प्रलंबित वास्को कदंब बसस्थानक प्रकल्प मार्गी लागावा यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. वास्को मासळी मार्केट प्रकल्प मार्गी लावावा यासाठी आपले सहकार्य असेल, असे आश्‍वासन पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिले.

वाडे येथील पै इस्पितळ ते हुतात्मा चौक, स्वातंत्र्यपथ दरम्यानच्या रस्त्याचे हॉटमिक्स करण्याच्या कामाचा शुभारंभ मंत्री गुदिन्हो व वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांच्या हस्ते झाला. हॉटमिक्ससाठी ७ कोटी रुपये खर्च होणार आहेत. याप्रसंगी नगरसेवक दीपक नाईक, भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य जयंत जाधव, माजी नगराध्यक्ष क्रितेश गावकर, नगरसेवक गिरिश बोरकर आदी उपस्थित होते.

गोव्यातील धार्मिक सलोखा हे देशातील एक आदर्श उदाहरण बनले असून, ते आम्हाला सांभाळून ठेवायला हवे. गोवेकरांनी जातधर्म न बघता नेहमी बंधुत्वपणा संभाळला आहे. त्यामुळे कोणी कोणतेही वक्तव्य केले म्हणून गोवेकर त्या वक्तव्याला कधीच बळी पडणार नाहीत. गोव्यातील सर्वधर्मीयांच्या बंधुत्व, ऐक्याच्या आड कोणी येऊ शकत नसल्याचे मॉविन गुदिन्हो यांनी सांगितले.

वास्को आणि दाबोळी मतदारसंघाचा विकास व्हावा यासाठी आपण व आमदार साळकर संयुक्तपणे काम करणार आहोत. वास्को हे औद्योगिक राजधानीचे शहर आहे. येथे रेल्वे, विमान, बंदर, गोवा शिपयार्ड वगैरे असल्याने या शहरामध्ये चांगल्या पायाभूत साधनसुविधा असल्या पाहिजेत. त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

गुदिन्हो यांच्या मार्गदर्शनामुळे विकासकामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे. लोकांच्या ज्या मागण्या आहेत, त्या आम्ही पूर्ण करणार आहोत, असे साळकर म्हणाले. दाबोळीच्या मानाने वास्को विकासकामांच्या बाबतीत बराच मागे असल्याचा पुनरुच्चार आमदार कृष्णा साळकर यांनी केला. वास्कोच्या विकासासाठी आमच्यामध्ये समन्वय असण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही पावले उचलली आहेत, असेही ते पुढे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AFG: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला 'हा' चमत्कारीक रेकॉर्ड; रोहित-प्रसिद्ध कृष्णाचा मोठा धमाका! VIDEO

"काम लवकर पूर्ण करा, नाहीतर..."; सांकवाळमध्ये आंदोलनाचा उडणार भडका; एमईएस कॉलेजजवळील रस्ते कामातील विलंबावर नागरिकांचा संताप

Pakistan Bomb Blast: 'पहिला स्फोट झाला अन् मदत करायला गेले...', पाकिस्तानात बॅक-टू-बॅक धमाके; 7 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

Goa Coal Mining: "गोव्यातून कोळसा हद्दपार करा!", गोवा फॉरवर्डने फुंकले आंदोलनाचे रणशिंग; सरकारला दिला थेट इशारा

Bangladesh Hindu Protest: "प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेवर बूट ठेवून केली विटंबना..."; इस्लामिक कट्टरपंथियांविरोधात बांगलादेशात हिंदूंचा महाआक्रोश VIDEO

SCROLL FOR NEXT